JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Budget: ST मध्ये 'हाफ तिकीट' जाहीर होताच महिला प्रवाशांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Budget: ST मध्ये 'हाफ तिकीट' जाहीर होताच महिला प्रवाशांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पाहा Video

महाराष्ट्र राज्याचे बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यामध्ये महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 10 मार्च: ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ हे ब्रीदवाक्य अनेकदा आपल्या कानावर पडले असेल. ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ‘लाल परी’ची ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे. नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडमधील महिलांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. यात महिलांसाठीही विविध घोषणा करण्यात आल्या. त्यात महत्त्वाची म्हणजे सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सुट मिळणार आहे.

ज्येष्ठांसोबत महिलांनाही सवलत एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे व त्यानंतर आता महिलांना देखील 50% तिकीटात सूट देण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सांगलीत गॅस सिलेंडरला बाय-बाय! लोकांनी एकत्र येत दिला निरोप, Photos महिला वर्गातून निर्णयाचे स्वागत राज्य सरकारने महिलांना एसटी बस तिकीट दरात सवलत देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत होत आहे. ज्या महिला नेहमीच लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या