JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एका एकरात होऊ शकता लखपती, कोणतं आहे ते फळं, कशी करायची लगावड? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

एका एकरात होऊ शकता लखपती, कोणतं आहे ते फळं, कशी करायची लगावड? पाहा तज्ज्ञांचा सल्ला

कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. या प्रकारच्या शेतीसाठी ड्रॅगन फ्रुटची शेती फायदेशीर आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 10 जुलै :  शेतकऱ्यांचा कल आता आधुनिक शेतीकडे वाढतोय. कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. या प्रकारच्या शेतीसाठी ड्रॅगन फ्रुटची शेती फायदेशीर आहे. त्यामुळे राज्यात देखील ही शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. ही शेती कशी करावी? याबाबतची महत्त्वाची माहिती बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिलीय. कशी करावी लागवड? - कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12× 5 या अंतरावर ड्रॅगन फ्रुट ची लागवड करावी - ड्रॅगन फ्रूटचे चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी बियाणं चांगल्या दर्जाचे असावे

- ड्रॅगन फ्रुटचे कलम केलेले रोप लागवड केल्यास त्यापासून लवकर आणि चांगले उत्पादन मिळत - कलम केलेली रोपे पुनर्लागवड केल्यास ड्रॅगन फ्रुट तयार होण्यास कमी वेळ लागतो - ड्रॅगन फ्रुटची लागवड मे ते जुलै दरम्यान केली जाते. - ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारची शेतजमीन लागत नाही. - ज्या शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जाणार आहे त्या जमिनीत कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. - ड्रॅगन फ्रुटची झाडे लेसी असतात म्हणजेच हे एक वेलवर्गीय पीक आहे.त्यामुळे या पिकाला आधार देणे अतिशय महत्त्वाचे असते. याला आधार देण्यासाठी शेतात सिमेंटचे खांब गाडणे आवश्यक आहे. एका खांब्याचा आधार घेत ड्रॅगन फ्रुटची 2-4 झाडे लावता येतात - तुम्ही एक एकर जमिनीत शेती केली तर सुमारे वर्षभरात सहा ते सात लाख रुपयापर्यंतच निव्वळ नफा यामधून मिळू शकतो. जनावरांसाठी वैरण लावा आणि सरकारी योजनेचा लाभ मिळवा, अशी आहे योजना खत व्यवस्थापन कसं हवं? फळ, फुल, भाज्या या प्रकराच्या शेतीप्रमाणेच ड्रॅगन फ्रुटमध्येही खतांचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. या शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा सर्वाधिक वापरण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेणखत, जैविक औषध, जीवामृत या प्रकारच्या खतांचा वापर करणेही आवश्यक आहे, अशी माहिती चांडक यांनी दिली, शेतकरी त्याचे उत्पन्न वाढावे त्यामुळे अनेक शेतकरी आता फळबागा, फुले, अशा प्रकारच्या आधुनिक शेती करताना दिसतात मात्र अल्प कालावधी मध्येच महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुट हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले कारण या मागचे कारण म्हणजे ह्या ड्रॅगन फ्रुट हे फळ खाल्यानं अनेक आजारांवर मात करता येते. त्याचबरोबर  याचा बाजारात भाव 200 ते 300 रुपये प्रति किलो आहे, त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या