रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 12 एप्रिल: काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या. आता लकवरच या परीक्षेचे निकाल विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहेत. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात करिअर करावं हे माहीत नसतं आणि त्यामुळेच त्यांची द्विधा मनस्थिती निर्माण होत असते. मात्र कमी वयात व्यावसायिक शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यासाठी बीडमधील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ मोहन लोहकरे यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीकडे विद्यार्थ्यांचा कल बीड येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकध्ये सहा प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून सर्वाधिक विद्यार्थी हे संगणक तंत्रशास्त्र अर्थात कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी अर्ज करत आहेत. या मागचे कारण म्हणजे सध्या तंत्रज्ञानाचा काळ असल्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच कमी काळामध्ये जास्त पगार देखील मिळतो.
दहावीनंतर ITI प्रवेशाच्या संधी बीड येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक येथे दहावीनंतर विविध कोर्स आहेत. त्यासाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. प्रत्येक कोर्ससाठी वेगवेगळी प्रवेश क्षमता आहे. तसेच या कोर्सचा कालावधी तीन वर्षांचा आहे. दहावीनंतर या कोर्सला करू शकता अर्ज सिविल इंजीनियरिंग-60 मेकॅनिकल इंजिनिअरिंग-60 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन-30 प्रिंटिंग टेक्नॉलॉजी-30 कॉम्प्युटर टेक्नोलॉजी-60 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग-60 India Post Recruitment: 10वी पाससाठी मुंबईत जॉबची सर्वात मोठी संधी; ‘या’ पदांसाठी लगेच करा अप्लाय बारावीनंतर ITI प्रवेशाच्या संधी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी देखील पॉलिटेक्निक कोर्स निवडून करिअर घडू शकतात. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक बीडमध्ये काही प्रमाणातच प्रवेश क्षमता उपलब्ध आहेत. बारावी उत्तीर्ण वर हा कोर्स केल्यानंतर याचा कालावधी हा दोन वर्ष आहे बारावीनंतरचे उपलब्ध कोर्स सिविल इंजीनियरिंग- 6 मेकॅनिकल इंजिनिअरिंग-6 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकामुनिकेशन-3 प्रिंटिंग टेक्नॉलॉजी-3 कॉम्प्युटर टेक्नोलॉजी-6 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग-6 अशी असेल प्रवेश प्रक्रिया पॉलिटेक्निक कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. www.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन विद्यार्थी प्रवेश प्रक्रियासाठी अर्ज करू शकतात. तसेच शासकीय तंत्रनिकेतन नाथापूर रोड, खंडेश्वरी मंदिराजवळ, विप्र नगर, बीड, महाराष्ट्र 431122 बीड (संपर्क क्रमांक- (02442 222603 ) संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकतात. नामांकित कंपनीत प्लेसमेंट शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लवकर जॉब मिळावा अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा असते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते. यात टाटा मोटर्स, टोयोटा, व्हिडिओकॉन, महेंद्रा, ह्युंदाई, जॉन डियर यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ITI करून करियरची संधी मागील दोन वर्षांपासून सर्वाधिक विद्यार्थ्यांची पसंती कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी आहे. अनेक विद्यार्थ्यांचे एप्लीकेशन या कोर्ससाठी येत आहेत. मात्र या पाठोपाठ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, या कोर्ससाठी देखील अनेक विद्यार्थी उत्सुक असल्याचे दिसून येते. व्यावसायिक शिक्षण असल्यामुळे नोकरीच्या संधी देखील अनेक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध होत आहेत, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ मोहन लोहकरे यांनी दिली.