पंकजा मुंडे या चांगल्या नेत्या आहे. राष्ट्रीय सचिव आहे, त्यामुळे त्यांना कुठल्या ठिकाणी आडकाठी नाही.
बीड, 21 जानेवारी : ‘बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या,’ असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली मनातली भावना बोलून दाखवली. तर, ‘पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहे तसंच राज्यातील पक्ष श्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार’ असल्याची सूचक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बीड जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदार संघाच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या नवी जबाबदारी दिली जाणार याचे संकेत दिले आहे. ‘पंकजाताई त्यांचा जिल्हा चांगला सांभाळत आहेत, त्याच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व आहे. एक चांगल्या नेत्या आहे. राष्ट्रीय सचिव आहे, त्यामुळे त्यांना कुठल्या ठिकाणी आडकाठी नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन ढवळाढवळ करून नका या पंकजा मुंडेंच्या भावना आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहे असं बावनकुळे म्हणाले. ( मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेआधी धक्कादायक प्रकार, एकाला अटक ) तसंच, ‘उरलेले आमदार पळून जाऊ नये. 164 चे184 होऊ नये याची भीती आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला वाटते. त्यामुळे आपले आमदार थांबवण्याकरता असं बोलत आहेत. सरकार पूर्ण चालेल माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे चांगलं काम करतात डबल इंजिन सरकार आहे. जनतेला आता नवीन सरकारकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे मला वाटतं आता सरकार वरून कपोल कल्पित बातम्या केवळ आमदार आणि कार्यकर्त्यांना टिकून ठेवण्याकरिता पेरल्या जात आहेत, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (फडणवीस रात्री उशीरा शिंदेंच्या भेटीला; 1 तासाच्या चर्चेनंतर तडकाफडकी गेले, चर्चांना उधाण) ‘शिवसेनेच्या चिन्हाबाबत ही केस निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. ही केस सुप्रीम कोर्टाकडे नाही आयोगाला जे योग्य वाटतं नियमाप्रमाणे आयोगाने तो निर्णय घ्यायचा त्यामुळे आमची काही भूमिका नाही. आयोगाकडे एकनाथ शिंदे यांनी कायदे डॉक्युमेंट दिले आहे. उद्धव ठाकरेंना नका दाखवू नये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा काही यात सहभाग नाही, असंही बावनकुळे म्हणाले. सत्यजित तांबेंनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला समर्थन मागितले नाही त्यांनी समर्थन मागितलं तर भारतीय जनता पार्टीच्या पक्ष शैक्षणिक बोलून त्यावर निर्णय घेतला जाईल, असंही बावनकुळे म्हणाले. फीड पाठवलं आहे.