JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed Student Heart Attack : बापरे! दहावीच्या परीक्षेआधी 15 वर्षांच्या शाळकरी मुलाचा हृदयविकारामुळे मृत्यू, बीडमधील घटना

Beed Student Heart Attack : बापरे! दहावीच्या परीक्षेआधी 15 वर्षांच्या शाळकरी मुलाचा हृदयविकारामुळे मृत्यू, बीडमधील घटना

दहावी परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना बीडच्या पाटोदा शहरात उघडकीस आले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 02 मार्च : दहावी परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना बीडच्या पाटोदा शहरात उघडकीस आले. सय्यद साद सय्यद कादर (15) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तो 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघात या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. मुंबईहून दोन दिवसांपूर्वीच तो परीक्षेसाठी पाटोदा येथे आला होता.

सय्यद साद हा पाटोदा शहरातील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात क्रिकेटमध्ये त्याला आवड असल्याने व गुणवान खेळाडू असल्याने बीड जिल्ह्यातून 14 वर्षांच्या मुलांच्या क्रिकेट संघात त्याची दोन महिन्यांपूर्वी निवड झाली होती. सध्या मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात तो खेळत होता.

भररस्त्यात गर्लफ्रेंडला मारहाण करत होता तरुण; बचावासाठी मध्ये पडला साऊथ स्टार अन…

संबंधित बातम्या

मात्र, 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने दोन दिवसांपूर्वीच तो पाटोदा येथे आला होता. तो परीक्षेची तयारी करत होता. काल सकाळी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केले जात आहे.

बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातवीतील मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील शाळेला जा म्हणल्याचा राग मनात धरून त्याने आपले जीवन संपवले. बीडच्या वडवणी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.

शिक्षणासाठी परत बीडला जा, असे म्हणाल्याचा राग मनात धरून सातवीत शिकणाऱ्या चिमुकल्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. प्रदीप अंगद साबळे (13) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

जाहिरात
आईच्या मर्जीविरोधात मुलीने केलं Love Marriage, अन् अख्खं कुटुंबच संपलं

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील अंगद साबळे यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सात दिवसांपूर्वी झाला होता. बहिणीच्या विवाहासाठी भाऊ प्रदीप साबळे (13) हा बीडहून गावी आलेला होता. विवाहसोहळा पार पडल्यानंतर वडील अंगद साबळे यांनी प्रदीप याला तू बीडला शिक्षणासाठी जा, असे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या