रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 3 जून : राज्यात आता सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. शेतकऱ्यांसाठी तर पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांची सध्या लगबग सुरू आहे. मान्सून दाखल होताच बळीराजाची ही धांदल आणखी वाढेल. ही कामं करत असताना शेतकऱ्यांनी एका गोष्टी खबरदारी घेणं आवश्यक आहे. अन्यथा, त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. पाऊस पडला की विद्यूत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार नवे नाहीत. ग्रामीण भागात तर या काळात अनेकदा लाईट नसते. विद्युत वाहिनीतून जमिनीमध्ये करंट उतरून अनेकदा शेतकरी आणि जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत.
बीड येथील विद्युत निरीक्षक कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विद्युत अपघातामुळे 40 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागलाय. तर विद्युत तारेच्या खांबाला बांधल्यामुळे 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे. काय काळजी घ्याल? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे प्रकार घडू नये यासाठी, ‘विद्यूत वाहिन्यांच्या खाली बांधकाम करू नये. हे बांधकाम धोकादायक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे जीवघेणे अपघातही होऊ शकतात. शेतामध्ये किंवा उघड्या मैदानात विद्यूत खांबाच्याजवळ खेळणे टाळावे. पावसाची होणार लवकरच एन्ट्री, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी, पाहा Video पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विहिरीवर मोटार लावल्यानंतर प्लग सॉकेटमध्ये वायर अचानक खेचू नका. विहिरीवरील पॉवर पॉईंट लहान मुलांच्या हाताला सहज लागेल, असे ठेवू नका. वादळ किंवा वाऱ्यामुळे तारा तुटून खाली पडल्या तर त्याला हात लावू नका. जनावरांना त्याच्याजवळ जाऊ देऊ नका. शेतामधील डीपीला हात लावू नका,’ असं आवाहन विद्युत निरीक्षक गणेश सोळुंके यांनी केलंय. बीड जिल्ह्यात पावसळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा विद्युत खांबाचा करंट जमिनिवर उतरल्यामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करणे आवश्यक आहे, असं साोळुंके यांनी स्पष्ट केलं.