JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; युवक जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, सोळंके घराणं नाराज?

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; युवक जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, सोळंके घराणं नाराज?

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 15 जानेवारी : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जयसिंग सोळंके यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोळंके कुटूंब पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. यातच आता जयसिंग सोळंके यांनी राजीनामा दिल्यामुळे बीडच्या राजकारणात राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. जयसिंग सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत.  सोळंके कुटूंब पक्षावर नाराज?  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षांनी अचानक राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतने जयसिंग सोळंके यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोळंके कुटूंब पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. हेही वाचा :  नाराजी दूर? पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर सोळंकेंना डावललं?  आमदार प्रकाश सोळंके हे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य असतानाही त्यांना राष्ट्रवादीकडून अनेकदा डावलण्यात आलं. त्यांना मंत्रिपदाची संधी देखील देण्यात आली नाही. साखरसंघाच्या अध्यक्षपदी आमदार सोळंके यांची वर्णी लावण्यात येणार होती, मात्र तिथेही पक्षाने उपाध्यक्ष पदावर त्यांची बोळवण केली. 4-5 दिवसांपूर्वी शिक्षक आमदार निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीतही आमदार सोळंके दिसले नाहीत. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांचे पुतने जयसिंग सोळंके यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या