JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed News: आठवीतला अभय करणार 'इस्रो'ची वारी, पाहा त्यानं कसं मिळवलं यश? Video

Beed News: आठवीतला अभय करणार 'इस्रो'ची वारी, पाहा त्यानं कसं मिळवलं यश? Video

बीड जिल्ह्यातील 33 विद्यार्थी नासा आणि इस्रो ला भेट देणार आहेत. पाली जिल्हा परिषद शाळेतील आठवीचा विद्यार्थी अभय वाघमारे याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 14 मार्च: शालेय विद्यार्थ्यांनी ‘नासा’ (NASA) आणि ‘इस्रो’ (ISRO) या अवकाश संशोधन संस्था पुस्तकातूनच अभ्यासलेल्या असतात. पण बीडमधील शालेय विद्यार्थ्यांना या संस्था प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातील 110 विद्यार्थ्यांतून 33 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून 11 विद्यार्थी ‘नासा’ तर 22 विद्यार्थी ‘इस्रो’ला जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील पालीच्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अक्षय वाघमारे याची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. बीड जिल्हा परिषदेचा उपक्रम बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन संस्था पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातून परीक्षा घेऊन 33 विद्यार्थ्यांनी निवड केली. त्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर ही परीक्षा झाली. रविवारी जिल्हा स्तरावरील 110 विद्यार्थ्यांची अंतिम चाचणी परीक्षा बीडमधील पोतदार स्कूलमध्ये झाली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातील 110 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के उपस्थिती लावली होती.

33 विद्यार्थ्यांची निवड बीड जिल्हा स्तरावर झालेल्या निवड चाचणी परीक्षेतून 33 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. गुणवत्तेनुसार ही निवड झाली असून पहिल्या 11 जणांना ‘नासा’ भेटीची संधी मिळणार आहे. तर त्यापुढील 22 जणांना ‘इस्रो’वारी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत उत्सुकता आहे. Nashik News : मल्लखांब शिका आणि फिट रहा! 106 वर्षांच्या परंपरेत घडतायत अनेक मल्ल, Video पालीच्या अभय वाघमारेला संधी नासा आणि इस्रो भेटीसाठी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पाली येथील जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणाऱ्या अभय वाघमारेची निवड झाली आहे. अभय हा सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून तो इस्रोला जात असल्याने गावात उत्साह आहे. बीड येथे झालेल्या अंतिम परीक्षेत त्याला 58 गुण मिळाले. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असून त्याला शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या