JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड आहे की बिहार? सलग 3 दिवसात तीन जणांचा खून, अंगावर शहारे आणणाऱ्या घटना

बीड आहे की बिहार? सलग 3 दिवसात तीन जणांचा खून, अंगावर शहारे आणणाऱ्या घटना

बीड जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसात 3 जणांचा खून झाला आहे.

जाहिरात

मृत तरुण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 15 एप्रिल : बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 3 दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्याप यातील दोन प्रकरणात आरोपींना अटक झालेली नाही. सलग तीन दिवसात तीन खून झाल्याने बीडचा पुन्हा बिहार होतोय की काय? अशी चर्चा

सुरू झाली आहे. बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुवारी मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून, बीडच्या पाली येथील बिंदुसरा धरणालगत, अक्षय नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मृत अक्षयची हत्या करणारे त्याचेच मित्र असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दुसऱ्या एका घटनेत कुक्कडगाव येथील गणेश आठवले यांच्या शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने या महिलेची गळा चिरुन हत्या केली असावी, त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीमध्ये फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेचे वय साधारण 30 ते 32 वर्षांदरम्यान असावे. पिंपळनेर पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंडके नसलेला मृतदेह आढळून आल्याने मृत महिला कोण आहे आणि मारेकरी कोण आहेत? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या दोन घटनेच्या धक्क्यातून बीडकर सावरतात न सावरतात तोच तिसरी घटना आष्टी तालुक्यात समोर आली आहे. झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून पतीने खून केल्याची घटना, आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडली. निलम संभाजी वाल्हेकर (वय 32) असे मृत पत्नीचे नाव आहे. यातील आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान सलग तीन दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्याने, बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बीडचा पुन्हा एकदा बिहार होतोय की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या