JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बारामती पोलिसांची मोठी कारवाई, पिस्तुल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, पिस्तुल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

5 पिस्तुलांसह दहा जिवंत काडतुसे जप्त करत पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 4 फेब्रुवारी : बारामती तालुक्यात बेकायदेशीर पिस्तुल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेल्याच आठवड्यात 7 पिस्तुल मिळाल्यानंतर आज पुन्हा 5 पिस्तुलांसह दहा जिवंत काडतुसे जप्त करत पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. हनुमंत अशोक गोलार (वय 22,वर्षे रा.जवळवाडी खरवंडी, कासार ता. पाथर्डी जि. अहमदनगर), अल्ताफ सज्जाद पठान (वय 30,वर्षे रा नाईकवाडी मोहल्ला ता. शेवगाव जि.अहमदनगर), संतोष प्रभाकर कौटुंबे (वय 38 वर्षे,रा मारवाड गल्ली ता.शेवगाव जि.अहमदनगर), जफर अन्सार इनामदार (वय 28,नाईकवाडी मोहल्ला ता. शेवगाव जि.अहमदनगर) जावेद मुनीर सय्यद (वय 22 वर्षे रा.आखेगाव रोड भापकरवस्ती, ता.शेवगाव जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ग्रामीण पोलिसांनी 12 पिस्तूल व 20 जिवंत काडतुसे केली जप्त मागील आठवड्यात बारामती तालुका पोलीस ठाण्यात एका जबरी चोरीतील आरोपीकडे विनापरवाना पिस्तुल मिळाले होते. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या इतर मित्रांकडेही विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती दिली होती. त्यावरून सदर आरोपीच्या मित्राकडून 7 पिस्तुल व 10 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. हेही वाचा - रात्रीच्या काळोखात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, विरोध करताच उचललं हे पाऊल सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच वरील आरोपी बेकायदेशीर पिस्तुल विक्री करण्यासाठी बारामतीत येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आणखी 5 पिस्तुल व 10 जिवंत काडतुसे मिळून आली. बारामती तालुका पोलिसांनी चालू वर्षात आतापर्यंत 11 आरोपींना अटक करून 12 पिस्तूल व 20 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या