मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रात्रीच्या काळोखात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, विरोध करताच उचललं हे पाऊल

रात्रीच्या काळोखात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, विरोध करताच उचललं हे पाऊल

महिलांवरील अत्याचार हा भारतात सार्वकालीक चिंतेचा विषय. या महिलेला चक्क अॅसिड पाजण्याचा (acid attack) प्रयत्न शेजाऱ्यानं केला.

महिलांवरील अत्याचार हा भारतात सार्वकालीक चिंतेचा विषय. या महिलेला चक्क अॅसिड पाजण्याचा (acid attack) प्रयत्न शेजाऱ्यानं केला.

महिलांवरील अत्याचार हा भारतात सार्वकालीक चिंतेचा विषय. या महिलेला चक्क अॅसिड पाजण्याचा (acid attack) प्रयत्न शेजाऱ्यानं केला.

बदायुं, 4फेब्रुवारी : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) गुन्हेगारीबाबत कायमच चर्चेत असलेलं राज्य. याच राज्यातून आता महिला अत्याचाराची एक अतिशय गंभीर घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशाच्या बदायूं जिल्ह्यात (Badaun) ही घटना घडली आहे. जिल्ह्यात कादर चौक ठाण्याच्या विभागात येणाऱ्या एका गावात महिलेला चक्क अॅसिड पाजण्याचा (acid attack) प्रयत्न शेजाऱ्यानं (neighbor) केला. या महिलेनं शेजाऱ्याच्या कृतीला विरोध केला असता त्यानं महिलेच्या पोटात चाकू खुपसला.

गंभीरपणे जखमी झालेल्या महिलेला आता जिल्हा रुग्णालयातून बरेलीला हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. त्यातील माहितीनुसार, सकरी कासिमपूर गावात काजल नावाची ही तीसवर्षीय महिला आपल्या घरात मुलांसह (kids) एकटी राहत होती. तिचा पती दिल्लीत (Delhi) मजुरी करतो.

सोमवारी रात्री (night) उशीरा या महिलेच्या घरात शेजारी राहणाऱ्या सतेंद्र सिंहनं घुसखोरी केली. त्यानं महिलेला जबरदस्ती ऍसिड पाजण्याचा प्रयत्न केला. तिनं विरोध केल्यावर तिच्या पोटात चाकू (knife) खुपसला.

त्या महिलेचा आणि मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून नातेवाईक (relatives) घटनास्थळी पोचले. त्यांनी पोलिसांना (police) हा प्रकार कळवला. महिला गंभीर जखमी असल्यानं आता तिला जिल्हा रुग्णालयातून बरेलीच्या रुग्णालयात पाठवलं गेलं आहे. बदायूंचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा म्हणाले, 'महिलेच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार केस दाखल करून घेत पुढील कारवाई केली जात आहे. महिलेला अजून बोलणं शक्य होत नसल्यानं यामागची कारणं कळू शकली नाहीत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Delhi, Uttar pradesh