JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'त्याची किंमत मला मोजावी लागली', शरद पवारांनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

'त्याची किंमत मला मोजावी लागली', शरद पवारांनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

बाबासाहेबांनी या भागात शैक्षणिक प्रगती नसताना त्यांनी लक्ष घेतला. मोलाची कामगिरी केली. त्या कालखंडात एक मर्यादा होत्या.

जाहिरात

बाबासाहेबांनी या भागात शैक्षणिक प्रगती नसताना त्यांनी लक्ष घेतला. मोलाची कामगिरी केली. त्या कालखंडात एक मर्यादा होत्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : ’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कालखंड आठवतोय. अनेक संघर्ष झाले. त्याची काही किंमत मला मोजावी लागली. दुसर विद्यापीठ उभं राहील त्याचा भाग मला होता आलं’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यापीठाच्या नामांत्तर लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. औरंगाबादमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांत्तर लढ्यात सत्तेतून पायउत्तार व्हावे लागले होते. त्या आठवणींबद्दल उजाळा दिला.

‘देशाला घटनेच्या माध्यमातून संशोधित प्रणाली दिली. बाबासाहेबांनी या भागात शैक्षणिक प्रगती नसताना त्यांनी लक्ष घेतला. मोलाची कामगिरी केली. त्या कालखंडात एक मर्यादा होत्या. शैक्षणिक संस्था म्हणलं की अडचणी होत्या. त्यात औरंगाबादला शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा त्यांच्या निर्णयाने शिक्षणाचे मोठे जाळे उभे झाले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं कार्य केलं. अनेक संघर्ष झाले. त्याची काही किंमत मला मोजावी लागली. दुसर विद्यापीठ उभं राहील त्याचा भाग मला होता आलं, असं पवार म्हणाले. (राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा कुठे होता? रोहित पवारांचा भाजपला खोचक सवाल) ‘मराठवाडा म्हटलं की, शेती आणि सामान्य माणूस वेगळा संबंध आहे. शेती मर्यादित पिकांची होती आज ती बदलली जात आहे. उसाचा मोठा भाग असणारा भाग होत आहे. नवीन संशोधन कसं अंमलात आणता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या माध्यमातून अनेक काम होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात जालना आणि नागपूर भागात नवीन संशोधन संस्था सुरू करणार आहोत, असंही पवार म्हणाले. (Aditya Thackeray Yuva Sena : ठाकरे गटाची गळती काही थांबेना, आता युवासेनेत मोठं खिंडार) तर, ‘मराठवाडा संतांची भूमी त्या त्या भगांमध्ये विद्यापीठ नॉलेज पावर सेंटर आहे. जालन्याला आम्ही समुद्र आणला आहे.. या पदवीच्या लायकीचा आहे का नाही माला माहित नाही मी लहान विद्यार्थी आहे. नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे व्हा. भारताला सुपर पॉवर बनविणारे व्हा’, असं नितीन गडकरी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या