शरद पवारांचा राजकीय प्रवास उलगडणारे दुर्मिळ फोटो
मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे.
राजकीय जीवनात पवारांच्या वाट्यात अनेक चढउतार आले.
मात्र, कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही.
पवारांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.
त्यांचे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.
वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
18 जुलै 1978 रोजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते आतापर्यंतचे सर्वांत तरुण CM ठरले.
10 जून 1999 रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
राज्यापासून केंद्रापर्यंत त्यांनी अनेक मोठमोठी पदं भूषवली.
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. ते ICC चेही अध्यक्ष राहिले.
2017 साली त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले.