JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुघलकाच्या काळापासून फेमस असलेली औरंगाबादची नान रोटी कशी बनते, पाहा Video

तुघलकाच्या काळापासून फेमस असलेली औरंगाबादची नान रोटी कशी बनते, पाहा Video

Naan Roti : औरंगाबादकरांना नान रोटीने भुरळ घातली आहे. ही नान रोटी कशी बनते जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी औरंगाबाद, 7 फेब्रुवारी :  औरंगाबाद शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ऐतिहासिक वास्तू आहेत. यासोबतच शहरामध्ये मोहमंद-बीन-तुघलक यांच्या काळामध्ये सैन्यासोबत आलेली नान रोटी प्रसिद्ध आहे. औरंगाबादकरांना या नान रोटीने भुरळ घातली आहे. मुस्लिम कुटुंबांमध्ये कोणताही समारंभ असो नान रोटीला मोठी मागणी असते. औरंगाबाद शहराने नगरची निजामशाही, मोगलशाही आणि नंतर हैदराबादची निजामशाही अशा शाही सल्तनती पाहिल्या. मात्र, त्याहीपूर्वी 14 व्या शतकात दिल्लीचे सुलतान मोहंमद-बीन-तुघलक यांनी दौलताबादला राजधानी बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे दख्खनकडे व्यवस्थितपणे लक्षात ठेवता येईल या उद्देशाने त्यांनी दिल्लीहून दौलताबादला राजधानी आणली. मात्र, काही कारणास्तव त्यांनी पुन्हा आपली राजधानी दौलताबादहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. मोहमंद-बीन-तुघलक यांच्या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था व्हावी. यासाठी पोळ्या किंवा दुसरं काही करणं शक्य नव्हतं. यासाठी नान रोटी हा पदार्थ त्यांनी सैन्याच्या जेवणासाठी समाविष्ट केला होता.

कशी तयार करतात नान रोटी?  ही नान रोटी खाल्ल्यानंतर दिवसभर जेवणाची गरज भासत नाही. स्पेशल खलियासोबत नान रोटी खाली जाते. नान रोटी लवकर खराब होत नाही. गव्हाचे पीठ, रवा, मैदा, सोडा, ईस्ट पावडर, बडीशेप, हळद, मीठ, यापासून नान रोटी तयार केली जाते. खलिया बनवण्यासाठी खसखस, खोबरे,गोडंबी, धने, कांदा, मीठ, मिरची, मसाला याचा वापर केला जातो. नान रोटी तयार करण्यासाठी विशेष पद्धतीचा एक चूल (तंदूर) असते जी लोखंडी असते. तिला मातीने सारून घ्यावे लागते. आग लावावी लागते. नान रोटी लाटणं झाल्यानंतर चुलीमध्ये वरती लावावी लागते. त्यानंतर लोखंडी लांब काडीने तिला चुलीच्या बाहेर काढून तेल लावले जाते. या चुलीजवळ बसलेल्या व्यक्तीला जवळपास 40 अंश तापमानामध्ये बसून नान रोटी भाजावी लागते, असं दुकानदार मालिक मोहम्मद आवेज सांगतात.

Aurangabad : औरंगाबादची बेस्ट पावभाजी, 25 वर्षांपासून कायम आहे चव! Video

संबंधित बातम्या

कुठं मिळेल नान रोटी? औरंगाबाद शहरातील गुड्डी लाईन, बेगमपुरा, कटकट गेट, रोशन गेट, उस्मानपुरा भागामध्ये नान रोटी मिळते. यात स्पेशल रव्याची नान रोटी 12 रुपयांला तर गव्हाची नान रोटी 8 रुपयांला मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या