JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गुहागरहून बेपत्ता झालेला अथर्व थेट सापडला गुजरातल्या इस्कॉन मंदिरात; घरी फोनही करायला नव्हता तयार

गुहागरहून बेपत्ता झालेला अथर्व थेट सापडला गुजरातल्या इस्कॉन मंदिरात; घरी फोनही करायला नव्हता तयार

12 वीमध्ये शिकणाऱ्या अथर्वला देवाच्या नामस्मरणाची आवड होती, त्यासाठी तो थेट गुजरातच्या इस्कॉन मंदिरात (ISKON temple Gujrat) जाऊन पोहोचला. घरी फोनही करायला तो तयार नव्हता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुहागर, 2 एप्रिल : एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली की मुलं तसं वारंवार करत असतात. पण गुहागरमधील एक तरुण देवाच्या नामस्मरणाच्या आवडीपोटी थेट गुजरातपर्यंत जाऊन पोहोचला. कुटुंबीय त्याच्या काळजीत असताना, तो मात्र घरी फोन करण्यासही तयार नव्हता अशी माहिती समोर आली आहे. गुहागर मधील देवघर येथून 31 मार्च रोजी अथर्व गोंधळेकर हा घरातून न सांगताच बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता दोन दिवस त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. मात्र शुक्रवारी सकाळी गुजरात मधील द्वारका परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरात तो असल्याची माहिती मिळाली. अथर्व हा सध्या 12 वीचे शिक्षण घेत आहे. मात्र त्याला अगदी लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. निर्जन ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात राहून ईश्वराचे नामस्मरण करायला त्याला आवडत होते. वाचा - पिवळी जेजुरी रंगली विविध रंगांत, पाहा खंडोबाच्या रंगपंचमीचे PHOTO बुधवारी घरातून बाहेर पडतानाही त्याने सोबत जपमाळ आणि पोथी नेली होती, अशी माहिती त्याचे वडील जितेंद्र गोंधळेकर यांनी दिली. त्यानुसार त्याला शोध घेतला जात होता. मात्र सकाळी त्याचा फोन आल्यानं तो गुजरातच्या मंदिरात असल्याचे समजले. फोन करण्यासाठी बळजबरी अथर्व इस्कॉन मंदिरात होता त्यावेळी मंदिर प्रशासनाने त्याला पाहिले होते. प्रशासनाने अथर्वला घरी फोन करायला लावला. पण तो तयार नव्हता अखेर त्याला बळजबरी करून घरी फोन करायला सांगितला, तेव्हा त्याने फोन केला आणि याबाबत माहिती दिली. खरं तर बारावीतील म्हणजे ऐन तारुण्यात येणाऱ्या मुलांमध्ये अध्यात्माविषयी फारशी आवड नसते. त्यांना कॉलेजात रमायला मित्रांबरोबर मस्ती करायला आवडते. पण मग अथर्वच्या मनात हा विचार कसा आला हे अद्याप समजू शकलेले नाही. अथर्व सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, त्याला आणण्यासाठी गुहागरहून रवाना झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या