सोन्याच्या जेजुरीचा आज रंगच न्यारा! खंडेरायाच्या गडावर अशी झाली रंगपंचमी!
दररोज पिवळी धमक दिसणारी जेजुरी शुक्रवारी मात्र, रंगीबेरंगी दिसत होती. जेजुरी गडावर खंडोबा देवाचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. पाहा फोटो (सौजन्य - बी.एम.काळे)
|
1/ 8
दररोज पिवळी धमक दिसणारी जेजुरी शुक्रवारी मात्र, रंगीबेरंगी दिसत होती. जेजुरी गडावर खंडोबा देवाचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून खास पूजा - अभिषेक करण्यात आला.
2/ 8
प्रातःकाळची भूपाळी पूजा-अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात आले. याद्वारे देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.
3/ 8
भारतीय लोककला संस्कृतीमधील लोकदेव आणि कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे वर्षातील जत्रा-यात्रा, सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
4/ 8
जेजुरी गडावर साजरा होणाऱ्या बहुरंगी-बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते.
5/ 8
सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली.
6/ 8
देवांना रंग लावल्यानंतर शहरामध्ये सणाच्या उत्साहाला उधाण आलं होतं आणि रोज पिवळी होणारी जेजुरी वेगळ्या रंगात बुडालेली दिसली.
7/ 8
केवळ देवालाच नव्हे तर संपूर्ण मंदिरामध्ये विविध रंगांची आकर्षक अशी उधळण करत हा उत्सव साजरा करण्यात आला.
8/ 8
या उत्सवामध्ये वर्षभर पिवळी धमक दिसणारी आणि सोन्याची असा नावलौकिक असलेली जेजुरी विविध रंगात बुडालेली पाहायला मिळाली.