नांदेड, 4 नोव्हेंबर : राजकारणातील अनेक नेत्यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तिसरी पिढी राजकारणात पाऊल टाकत असल्याचं दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांना दोन जुळ्या मुली आहेत. यापैकी श्रीजया चव्हाण राजकारणात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. नांदेडमध्ये लागलेल्या बॅनरवरुन याची चर्चा रंगली आहे. श्रीजयाच्या फोटोंमुळे चर्चा… काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. येत्या काही दिवसात ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने श्रीजया चव्हाण राजकारणात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया राजकीय बॅनरवर झळकली आहे. आतापर्यंत अशोक चव्हाण यांच्या पत्नी पडद्याच्या मागून राजकीय सूत्र हलवल असल्याची चर्चा होती. आता तर त्यांची मुलगी थेट राजकारणात एन्ट्री करीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत अशी घोषणा होणार का, याचीही उत्सुकता आहे
अमिता भाभींदेखील लोकप्रिय.. अशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या भोकरच्या आमदार नांदेड शहर आणि जिल्ह्यात त्या ‘अमिता भाभी’ याच नावानं ओळखल्या जातात. अशोक चव्हाण खासदार झाल्यानंतर अमिता चव्हाण यांची राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून एंट्री झाली. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण लोकसभेत निवडून आल्यावर अमिता चव्हाण विधानसभेसाठी उभ्या राहिल्या. अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक माधव किन्हाळकर हे भाजपच्या तिकिटावरून अमिता चव्हाणांविरोधात उभे होते. पण ही कठीण निवडणूक त्या 80 हजारांच्या फरकाने जिंकल्या होत्या. अमिता चव्हाण यांनी नांदेडमधली काँग्रेसची महिला आघाडी चांगलीच मजबूत केली आहे, असंही सांगितलं जातं. भारत जोडो’चा मार्ग चव्हाण ठरवत नाहीत’, राहुल गांधींच्या यात्रेवरून अशोकरावांचा पृथ्वीबाबांवर निशाणा! अमिता चव्हाण यांनी महिला आघाडी चांगली मजबूत केली आहे. नांदेड काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांची संख्या चांगली वाढली आहे. महिला आघाडीचं नेतृत्व अमिता चव्हाण करत असल्यानं विजयात त्यांचा मोठा वाटा असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.