JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 24 तासांच्या आत माफी मागा अन्यथा..., भाजपकडून अजित पवारांना अल्टिमेटम

24 तासांच्या आत माफी मागा अन्यथा..., भाजपकडून अजित पवारांना अल्टिमेटम

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता भाजपकडून इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुबई, 1 जानेवारी :  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता भाजप चांगलचं आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी 24 तासांच्या आत माफी मागावी अन्यथा उद्यापासून हिंदू समाज तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा ईशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवार यांना दिला आहे. तसेच अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात अनेक ठिकाणी भाजपाच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं आहे. नेमकं काय म्हटलं भोसले यांनी? विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना ते धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केलं आहे. आता यावरून अजित पवार यांना  भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी इशारा दिला आहे. राजकारणासाठी आमच्या छत्रपती संभाजी महाराज यांना निधर्मी किंवा सेक्युलर करू नका, 24 तासांच्या आत माफी मागा नाहीतर उद्यापासून हिंदू समाज तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असं तुषार भोसले यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  उद्धवजींबद्दल आदरच पण जेव्हा घर पेटतं तेव्हा.., नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर? केसरकरांचा निशाणा    दरम्यान याच वक्तव्यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या, मात्र धर्म बदलला नाही . शब्दछल करण्याला काही महत्त्व नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या