JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अखेर मनसेच्या 'इंजिन'ला जोडला भाजपचा डबा, 'या' जिल्ह्यात युतीची घोषणा

अखेर मनसेच्या 'इंजिन'ला जोडला भाजपचा डबा, 'या' जिल्ह्यात युतीची घोषणा

पालघरमध्ये युती झाल्यानंतर नाशिक आणि पुण्यातही युती होणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.

जाहिरात

पालघरमध्ये युती झाल्यानंतर नाशिक आणि पुण्यातही युती होणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पालघर, 27 सप्टेंबर : भाजप (bjp) आणि मनसेची (mns) युती होणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, अखेर मनसेचं इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं गेलं आहे. पालघरमध्ये (palghar) जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची (BJP-MNS alliance ) घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अखेरीस पालघरपासून या युतीला सुरुवात होणार आहे. तरुणाचं Ex-Girlfriend सोबत विकृत कृत्य; आधी मारहाण, मग सूटकेसमध्ये भरलं अन्.. पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. यासाठी वाडा तालुक्यात भाजप मनसे युतीची घोषणा करण्यात आली आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनीच याबद्दल माहिती दिली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरू आहे, असंही जाधव म्हणाले. तर पालघरचे भाजपचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे. T20 वर्ल्ड कप जिंकण्याची रणनीती ‘या’ हॉटेलमध्ये ठरणार, धोनीशी आहे खास कनेक्शन तर दुसरीकडे, आता पुणे महापालिकेची निवडणूक होत आहे. पुण्यात भाजप आणि मनसेची युती व्हावी, अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनी उघडपणे युतीचे संकेत दिले आहे. मात्र, अद्याप राज ठाकरे यांनी युतीबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. योग्य वेळी निर्णय घेणार, असं राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पालघरमध्ये युती झाल्यानंतर नाशिक आणि पुण्यातही युती होणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या