JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत 'मशाल'ही सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात!

Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत 'मशाल'ही सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात!

andheri east bypoll election मशाल चिन्हामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे दोन्ही गटांना पक्ष म्हणून वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं. तर ठाकरेंना मशाल आणि शिंदेना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं, पण उद्धव ठाकरे यांचं मशाल हे चिन्ह पुन्हा वादात सापडलं आहे. समता पक्षाने ठाकरेंना देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. समता पक्ष उद्या म्हणजेच शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे, पण त्यांना हे चिन्ह देऊ नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिल्यामुळे समता पक्षाच्या पाठिंब्याला फटका बसला आहे, असा दावा समता पक्षाकडून करण्यात येत आहे. अंधेरीच्या लढाईत ठाकरेंची नवी खेळी, ऋतुजा लटकेंचंही टेन्शन वाढलं! समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी चिन्हाच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, त्या पत्रावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही, त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शनिवारी ते कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत. मशाल हे चिन्ह समता पक्षाला आरक्षित करण्यात आलं आहे, तरीही शिवसेनेला हे चिन्ह कसं दिलं गेलं? असा सवाल उदय मंडल यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. ‘उद्धव ठाकरे रमेश लटकेंना घरात प्रवेशही देत नव्हते, त्यांना सतत..’, नितेश राणेंचे गंभीर आरोप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या