JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुफान आलंया! 'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील या गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO

तुफान आलंया! 'पाणी फाऊंडेशन'मुळे साताऱ्यातील या गावात फुललं आनंदवन; आमिर खानने शेअर केला VIDEO

एक जुटीनं पेटलं रान तुफान आलंया…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान आपल्या पाणी फाऊंडेशनद्वारा (Paani Foundation) केलेल्या कामाबाबत आनंद व्यक्त करीत असताना दिसत आहेत. आमिर खान याच्या (Aamir Khan Video) पाणी फाउंडेशनने सप्टेंबर 2018 मध्ये महान जपानी संशोधक अकीरा मियावाकी यांच्याकडून प्रेरणा घेत सायट्रीस पर्यावरण ट्रस्टसोबत मिळून या प्रवासाला सुरुवात केली. ज्यामध्ये एक पडीक जमिनीचं नंदनवन केलं. दोन वर्षांनंतर सप्टेंबर 2020 हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

आमिर खान याच्या (Aamir Khan) पाणी फाउंडेशनने (Paani Foundation) साताऱ्या जिल्ह्यातील न्हावी बुद्रुक या गावात गावकऱ्यांच्या मदतीने 2000 झाडं लावली. याचं जंगलात रुपांतर करण्यासाठी (जलद गतीने वाढ व्हावी) वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करीत याचं वृक्षारोपण करण्यात आलं. आताचा परिणाम खूप चांगला असून अभिमान वाटावा असाच आहे. हे घनदाट जंगल प्राण्यांसाठीहीदेखील हक्काचं निवासस्थान झालं आहे. हे ही वाचा- योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली आमिरने (Aamir Khan Instagram) हा अत्यंत सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने पोस्टवर लिहिलं आहे की, आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाऊंडेशनची टीम गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र व त्याच्या जवळील जलसंरक्षणाची कामं करीत आहोत. माणसांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जमिनीवर आज हिरवंगार जंगल उभं राहिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या