'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली

'योगी आदित्यनाथांनी राजीनामा द्यावा'; हाथरस प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्कर भडकली

बलात्कार पीडितेच्या दहनाचा एक व्हिडीओ स्वरा भास्करने शेअर केला आहे.

  • Share this:

लखनऊ, 30 सप्टेंबर : दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील सामूहिक बलात्कारामुळे पुन्हा एकदा देश हादरला. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेनंतर संपूर्ण देशाने संताप व्यक्त केला आहे. यावर अनेक कलाकारांनी आपला राग व्यक्त केला आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

खोटे एनकाऊंटर आणि गँगवॉर झाले

स्वरा भास्कर हिने ट्विट केलं आहे की, योगींनी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यांच्या शासन काळात उत्तर प्रदेशात काय कायद्याचे सर्रास उल्लंघन केलं जात आहे. त्यांच्या पॉलीसींमध्ये जातीसंबंधित वाद घडवून आणला, खोटे एनकाऊंटर, गँगवॉर झाले आणि उत्तर प्रदेशात बलात्काराची महासाथ पसरली आहे. हाथरस केस केवळ एक उदाहरण आहे.

हे ही वाचा-हाथरस प्रकरणी पोलिसांची अरेरावी, कुटुंबियांशिवाय पीडितेवर केले अंत्यसंस्कार

स्वराने आठवलेंवर साधला निशाणा

स्वरा भास्कर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी एक फोटो रीट्विट केलं आहे. यामध्ये आठवले यांनी पायल घोषसह राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. स्वरा भास्करने यावर लिहिलं आहे की, जर मंत्रींनी हा पाठिंबा हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात जिचं निधन झालं तिच्या कुटुंबीयांना दिला असता तर बरं झालं असतं.

Published by: Meenal Gangurde
First published: September 30, 2020, 2:35 PM IST

ताज्या बातम्या