JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ही चांगली गोष्ट आहे की..' कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

'ही चांगली गोष्ट आहे की..' कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Karnataka Assembly Election 2023 Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकानंतर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

अमृता फडणवीस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ यश मिळालं असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर, भाजपाला 65 जागांचा आकडाही पार करताना मोठी दमछाक झाली आहे. निकाल समोर आल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमृता फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या अमृता फडणवीस? कर्नाटक विधानसभा निवडणुका निकालावर विचारले असता अमृता फडणवीस म्हणाल्या, मला राजकीय बोलायचं नाही. पण ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला कर्नाटकची जनता संधी देती आहे. काल आम्ही आज काँग्रेस आहे. उद्या अजून कोणी राहील. हे प्रत्येकासाठी चांगलं आहे. मोदी जाऊन तिथे निवडू शकले नाही, अशी टीका होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. विधानसभेत काहीही झालं तरी लोकसभा निवडणुकीत मोदीजी जिंकतील, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. का झाला पराभव? पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यातील मोठे नेते भाजपाने कर्नाटकात प्रचारासाठी उतरवले होते. पंतप्रधान मोदी यांनी सलग दोन दिवस रोड शो केला होता. तरीही कर्नाटकात भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. वाचा - कर्नाटक निकालानंतर महाराष्ट्रात घडामोडींना वेग; ठाकरे गटाची खलबतं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर जेडीएसच्या वोट बँकेचा काही भाग काँग्रेसकडे गेला असल्याचा अंदाज आहे. कारण, भाजप आपली मतांची टक्केवारी सांभाळून आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला 18 टक्के मते मिळाली होती, ती यंदा सुमारे 13 टक्क्यांवर आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कमालीची वाढली आहे. अशा स्थितीत मुस्लीम समाजाची संपूर्ण मते यावेळी काँग्रेसकडे गेल्याचे मानले जात आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 42.93%, भाजपला 36.17% आणि JDS 12.97% मते मिळाली. राज्यातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झाले होते. यामध्ये विक्रमी 73.19 टक्के मतदान झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या