JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गुरुजी हे वागणं बरं नव्हं! टेबलवर झोपून शिक्षकाच्या फोनवर गप्पा , ZP शाळेतला प्रकार

गुरुजी हे वागणं बरं नव्हं! टेबलवर झोपून शिक्षकाच्या फोनवर गप्पा , ZP शाळेतला प्रकार

शिक्षक म्हणजे अगदी मुलांसाठी एक मोठा आदर्श असतात, मात्र त्यांनीच धक्कादायक कृत्य केलं आहे.

जाहिरात

अमरावती शिक्षक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती 28 जुलै : जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षक म्हणजे अगदी मुलांसाठी एक मोठा आदर्श असतात, मात्र त्यांनीच धक्कादायक कृत्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा परिसरात ही घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेत एक गुरुजी चक्क टेबलवर झोपून फोनवर बोलत होते. बराच काळ उलटून गेला तरी या शिक्षकांना कोणतंही भान नव्हतं.

सीमा हैदरवर संशय बळावला, ‘कराची कनेक्शनचा’ तपास सुरू

संबंधित बातम्या

टेबलवर झोपून पाय पसरुन फोनवर बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावातील एकाने व्हिडिओ काढल्या नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत गुरुजीची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वर्गात गोरगरीब विद्यार्थ्यांना हे असले गुरुजी खरंच शिकवत असेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान शाळेत झोपणाऱ्या या गुरुजीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या