JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास आम्ही विरोध करणार', नवनीत राणांचा आक्रमक इशारा

'लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास आम्ही विरोध करणार', नवनीत राणांचा आक्रमक इशारा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी आक्रमकपणे लॉकडाऊनविरोधात भूमिका मांडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 4 एप्रिल : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहता राज्य सरकार अलर्ट झालं असून लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावण्याबाबत शासकीय पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे. मात्र लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं चित्र आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी आक्रमकपणे लॉकडाऊनविरोधात भूमिका मांडली आहे. ‘गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे सर्व व्यापाऱ्यांचे, गरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्व व्यापार बंद आहे. गरीब लोकांचे रोजगार गेले आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनला आमचा विरोध आहे,’ अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. ‘रिक्षाचालक यांनी ईएमआयवर रिक्षा घेतल्या आहेत. व्यापाऱ्यांनी आपलं इलेक्ट्रिक बिल कसं भरावं?’ असाही प्रश्न खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा - मोठी बातमी : मंत्रिमंडळाची हाय व्होल्टेज बैठक, लॉकडाऊनबाबत होणार निर्णय ‘राज्यातील आर्थिक स्थिती पाहता आता हा लॉकडाऊन लोकांना सुद्धा मान्य नाही, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत जर लॉकडाऊन लागलं तर आम्ही त्याचा विरोध नक्की करणार आहोत. नियम कडक करा, पण लॉकडाऊन महाराष्ट्रात कुठेच मान्य नाही,’ असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. कॅबिनेटची सुरू आहे महत्त्वपूर्ण बैठक कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज रविवार 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण बैठक (Cabinet Meeting Today) आयोजित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनचा निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या