JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Akola : दोन महिन्यांपूर्वीच बनवलेला भुयारी मार्ग पावसाने तुंबला, पाहा VIDEO

Akola : दोन महिन्यांपूर्वीच बनवलेला भुयारी मार्ग पावसाने तुंबला, पाहा VIDEO

भुयारी मार्गाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. नवीन उड्डाणपूल आणि त्यालगत भुयारी मार्गाचे अकोलेकरांना देखील चांगलेच कुतूहल होते. मात्र, उड्डाणपुलागत असलेल्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. भुयारी मार्गात पाणी भरत असल्याने हा मार्ग प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 13 जुलै : शहरातील टावर चौक ते निशांत टावरपर्यंत भुयारी मार्ग **(**Tower Chowk to Nishant Tower subway) तयार करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भुयारी मार्गात पाणी साचले आहे. वाहतूक कोंडीची (Traffic jam) समस्या कमी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन दोन महिन्यांपूर्वीच हा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. मात्र, भुयारी मार्गात सध्या पाणीच पाणी आहे. पाण्याने भरलेला भुयारी मार्ग पाहता उभारणीसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात तर जाणार नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भुयारी मार्गाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. नवीन उड्डाणपूल आणि त्यालगत भुयारी मार्गाचे अकोलेकरांना देखील चांगलेच कुतूहल होते. मात्र, उड्डाणपुलागत असलेल्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. भुयारी मार्गात पाणी भरत असल्याने हा मार्ग प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र, पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचतच कसे आहे? असा सवाल सामान्य नागरिकांना पडत आहे. दोन महिन्यांपूर्वीच मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते उद्धाटन अकोला शहरातील विकास कामाचा ठेका दिलेल्या झेंडू कंस्ट्रक्शन कंपनीने अकोला शहरातील उड्डाणपूल तयार केला. या उड्डाण पुलाचे उद्घाटन 28 मे रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, खरच हा उड्डाणपुल आणि याच सोबत बनवण्यात आलेला उंडरपास म्हणजेच भुयारी मार्ग कसा बनला आहे याचे पितळ दोनच महिन्यात उघडे पडले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना भुयारी मार्गातून प्रवास करतांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचत आहे. आता यावर उपाय म्हणून मोटार पंप लाऊन पाणी काढले जात आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO भिंतीला देखील पाझर पावसाने थोडी विश्रांती घेऊन परत आपले आगमन केले असता आता तर या भुयारी मार्गांच्या भिंतीला देखील पाझर फुटला आहे. जणू हा पाझर नसून झंडू कंपनीने कसे काम केले आहे याची ग्वाही भिंती देत आहेत. पहिल्या पावसातच जर या भुयारी मार्गाचे असे हाल आहेत तर अजून तर पूर्ण पावसाळा बाकी आहे. भुयारी मार्ग बनवला हे सर्वांसाठी चांगलच आहे. मात्र, मार्गावरील पाण्याच्या निचऱ्यासाठी बायपास करायला पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO “मोटार सेंसॉर काम करत नसल्याने हे पाणी साचलं” नॅशनल हायवेचे अधिकारी गोकुळ रॉय सांगतात की, भुयारी मार्गातील मोटार सेंसॉर काम करत नसल्याने हे पाणी साचलं होतं. मात्र, आता या  सेंसॉरची दुरुस्ती करण्यात आली आहे. अशी समस्या परत येणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या