नितीन नांदुरकर, 20 ऑक्टोबर : जळगाव आणि अकोला जिल्ह्यात मागच्या काही महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवून ही चोर चकमा देत चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. घरफोडी, चेन स्नेचींग या घटनामुळे नागरिकही भयभीत झाले होते. दरम्यान तब्बल 9 जबरी चोऱ्या करणाऱ्या दोघांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी जळगाव आणि अकोला जिल्ह्यात जबरी चोऱ्या केल्याचे कबूली दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, अकोला शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे वाढदिवसाच्या कार्यक्रम आटोपून महिला दुचाकीने घरी परतत होत्या. त्यावेळी अज्ञात तीन जणांनी दुचाकीवर येवून महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रूपये किंमतीची 35 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात अकोला जिल्हा सिव्हील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा : रक्ताच्या एका थेंबामुळे 30 वर्षांनी उकललं जोडप्याच्या हत्येचं गूढ; जावईच निघाला आरोपी
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सापडले
अकोला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी केली असता यातील संशयीत आरोपी हे जळगाव शहरातील असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार तेथील पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. यात संशयित आरोपी आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी याला कुसुंबा येथून अटक केली आहे.
हे ही वाचा : डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक
पोलिसांनी खाक्या दाखवताच सगळचं सांगितलं
दरम्यान त्या दोन चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदारांची नावे सांगितले. या सगळ्यांनी मिळून अकोला जिल्ह्यातील एकूण 9 चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यातील दुसरा साथीदार दीपक रमेश शिरसाठ याला जळगावातील कासरवाडी येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. जळगाव आणि अकोला जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान चोरट्यांना अटक झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.