JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Supriya Sule : भाजपने महागाईवरही रस्त्यावर उतरावं, सुप्रिया सुळेंनी केली अजितदादांची पाठराखण

Supriya Sule : भाजपने महागाईवरही रस्त्यावर उतरावं, सुप्रिया सुळेंनी केली अजितदादांची पाठराखण

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कर्जत (अहमदनगर), 03 जानेवारी : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे. दरम्यान यावर काल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी वक्तव्य करत पाठराखण केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांची पाठराखण केली आहे. त्या अहमदनगरमधील कर्जत येथे बोलते होत्या.

सुळे म्हणाल्या की, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झालं असेल की सत्ताधारी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, मात्र एखादं वक्तव्य जर झालं असेल तर त्याबाबत तज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर चर्चा होऊ शकते. आज देशापुढे बेरोजगारी आणि महागाई हे मोठं आव्हान आहे. आंदोलने करण्याचा भाजपला अधिकार आहे मात्र जेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार हे बेरोजगारीवर बोलतात, महागाईवर बोलतात तेव्हाही भाजपने रस्त्यावर आमच्याबरोबर आंदोलनात उतरावं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली.

हे ही वाचा :  …आणि लक्ष्मण जगताप यांना पाहून फडणवीस झाले होते स्तब्ध)

संबंधित बातम्या

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता यावर त्या बोलत होत्या. कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयात कार्यक्रमासाठी आल्या असता बोलत होत्या.

भाजपच्या लोकांकडून महापुरुषांबाबत काही वक्तव्य झालं तर त्यावेळी ते दुटप्पी भूमिका घेतात अशी टीका सुळे यांनी केली. जेव्हा राज्यपालांनी आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला तर त्यांची भूमिका वेगळी असते.

जाहिरात

मात्र अजित पवारांनी कोणाचाही अपमान केलेला नाही, दादा नेमकी काय म्हणालेत हे कुणीतरी दोन मिनिटं शांतपणे ऐकून घेतलं तर त्यात दादांच्या मनात कुठल्याही प्रकारे अपमान करण्याची भावना नसल्याचं  दिसतं. स्वतःकडे कुठलाही विषय नसल्याने आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी भाजप हे अजित पवारांवर असे आरोप करून आंदोलन करत आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जाहिरात

बारामतीमध्ये येऊन काही लोक पवार कुटुंबियांचा करेक्ट कार्यक्रम करू असं म्हणत आहेत. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, कुणालाही कुठेही जाऊन लढण्याचा अधिकार आहे. त्यांचं बारामतीत स्वागत आहे, देशातील सर्वच नेते बारामतीत आले तरी मी त्यांचे स्वागत करते. त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी बारामतीत यावं आणि येथे केलेली कामे पहावीत असं सुळे म्हणाल्या.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेईन’ पंतप्रधान मोदींनी राणेंना झापलं, शिवसेनेच्या खासदाराचा गौप्यस्फोट

भारतीय जनता पार्टीची आरक्षणाबाबत काय भूमिका आहे ही मी पार्लमेंटमध्ये पाहिलं आहे. पार्लमेंटमध्ये भाजपचे काही नेते म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण देऊ नये हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं. ईडी सरकारचे खासदार ऑन रेकॉर्ड हे बोलले आहेत. त्यांनी केवळ धनगर समाजाचेच नाही तर मराठा समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजातील सर्वसामान्यांना धोका दिला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या