JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story: 20 हजारात सुरू केला चप्पलचा व्यवसाय, आता करतोय लाखोंची उलाढाल, Video

Success Story: 20 हजारात सुरू केला चप्पलचा व्यवसाय, आता करतोय लाखोंची उलाढाल, Video

अहमदनगर येथील विनोद कांबळे यांनी 20 हजारांचे कर्ज काढून चप्पलचे दुकान सुरू केले. आता स्वत:चा ब्रँड सुरू करून लाखोंची उलाढाल करतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 20 फेब्रुवारी: वाढत्या बेरोजगारीमुळे अनेक तरुण व्यवसायाकडे वळत आहेत. यामध्ये काही तरुणांना चांगले यशही मिळते. अहमदनगरमधील एका तरुणाने नोकरीसाठी प्रयत्न न करता व्यवसायाचा निर्णय घेतला. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने बँकेकडून कर्ज घेऊन चपलांचा व्यवसाय सुरू केला. केवळ 20 हजार रुपयांत सुरू केलेल्या व्यवसायातून विनोद कांबळे हे लाखोंची उलाढाल करत आहेत. त्यांचा हा प्रवास नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन चप्पलचे दुकान  विनोद कांबळे यांनी बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करणे गरजेचे होते. परंतु, नोकरी न करता विनोद यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. जवळ भांडवल नसल्याने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आणि चप्पल विकण्याचा व्यवसाय सुरू केला. बालिकाश्रम रोडवर सद्गुरू कृपा शुज नावाने दुकान सुरू केले. त्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली.

चप्पल बनवण्याचा यशस्वी प्रयत्न चप्पल विक्रीच्या दुकानाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने नफा देखील चांगला मिळू लागला. यातून विनोद यांनी चप्पल बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. सद्गुरू कृपा शुजची आद्याक्षरे घेऊन ‘एस. के.’ चप्पल बनवण्यास सुरुवात केली. एस. के. चप्पललाही ग्राहकांची चांगली पसंती मिळू लागली. चप्पल मार्केटमध्ये ‘एस. के.’ चप्पला ब्रँड म्हणून ओळखळी जावू लागली. त्यामुळे 80 स्क्वेअर फुटाच्या दुकानापासून झालेली सुरुवात आता मोठ्या दुकानात रुपांतरीत झाली आहे. एस. के. शूजचमध्ये विविध डिझाईन विनोद यांनी एस. के. शुजच्या विविध प्रकारच्या चपला बनवल्या आहेत. चपला, मोजडी ,वेगवेगळ्या कंपन्यांचे शूज , स्वतः डिझाईन चपला, मॅचिंग चप्पल, मॅचिंग शूज, मॅचिंग मोजडी ही त्यांची खासियत आहे. पुरुष मंडळी इथे आल्यानंतर आपल्याला आवडणारी ट्रेडिंगमध्ये चालणारी चप्पल हमखास खरेदी करतात. ग्राहकांना आपल्या वस्तू खरेदी करण्यासाठी आकर्षित करणे ही खास कला विनोद यांच्याकडे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चपलांचे मार्केटिंग करतात. काळ्या मसाल्याचे ‘सम्राट’, 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Video घरातील मंडळींची साथ विनोद यांनी चपलांचा व्यवसाय सुरू केल्यापासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चप्पल विक्री हा पारंपरिक व्यवसाय असून त्यात मोठा फायदा नाही, असे अनेकांनी सांगितले. परंतु, घरातील मंडळींनी साथ दिल्याने व्यवसायात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दाजी आणि भावाची मदत मौल्यवान होती, असे विनोद सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या