JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shirdi Sai Baba : द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल; शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

Shirdi Sai Baba : द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल; शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

Dvarkamai Temple Darshan : साई बाबांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आता द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत मोठा बदल करण्याचा निर्णय संस्थानाने घेतला आहे.

जाहिरात

शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी1 2 जून : देशभरातील साई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने श्री द्वारकामाई मंदिराच्या दर्शनाच्‍या वेळेत बदल करण्‍यात आले असून गुरुवार, 1 जून 2023 पासून श्री द्वारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार असल्‍याची माहिती साई संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ेपगी्ग श्री क्षेत्र शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो भाविक श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येत असतात. या ठिकाणी आल्‍यानंतर भाविक श्रींच्‍या समाधीसह द्वारकामाई, चावडी व गुरुस्‍थान आदी ठिकाणी प्राधान्‍याने दर्शनाकरिता जातात. बाबांनी त्‍यांच्‍या हयातीत संपुर्ण जीवन हे द्वारकामाई येथे व्‍यतित केले. आता रात्रीही द्वारकामाई खुले राहणार असल्याने रात्री उशीरा येणाऱ्या साईभक्तांना किमान द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपातून दर्शन घेता येणार आहे. वाचा - Vat Purnima 2023 : वटसावित्रीची पूजा करताना चुकूनही करू नका 3 गोष्टी, पाहा महत्त्वाचा Video या ठिकाणाहून बाबांनी अनेक भाविकांना अन्‍नदान, रुग्‍ण सेवा, ज्ञानदान या त्रिसुत्रीची शिकवण दिली. तसेच याठिकाणी बाबांनी असंख्‍य भाविकांना आपल्‍या लिलाही दाखवल्‍या. त्‍यामुळे द्वारकामाईस अनन्‍य साधारण महत्‍व आहे. साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थांकडून व्‍दारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी वारंवार होत होती. त्‍याअनुषंगाने संस्‍थानच्‍या तदर्थ समितीच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या सभेत श्री द्वारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍याबाबतचा निर्णय घेण्‍यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या