विखे पाटील यांना धक्का
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 19 जून : शिर्डी मतदारसंघात असलेल्या गणेशनगर साखर कारखान्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या आठ वर्षापासून सत्ता आहे. यावेळी मात्र विखे पाटील यांच्या विरोधात भाजपच्या कोल्हे गटाने दंड थोपाटले होते. ऐनवेळी कोल्हे गटाने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हात हातात घेतला आणि परीवर्तन मंडळाच्या माध्यमातून विखेंविरोधात रान पेटवले होते. त्याचा परीणाम असा झाला की 19 पैकी 18 जागा मतदारांनी कोल्हे थोरात गटाच्या पारड्यात टाकल्या आहेत. विखे पाटील यांना मोठा धक्का कोपरगाव मतदारसंघात असताना गणेशनगर साखर कारखान्यावर स्व. शंकरराव कोल्हे यांची 37 वर्ष सत्ता होती. मात्र, नंतर शिर्डी मतदारसंघात समावेश झाल्यानंतर कोल्हेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याची तक्रार कोल्हेंनी पक्षश्रेष्टींकडे केली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत असलेला विखे आणि कोल्हेंचा विरोध गणेशनगर कारखान्याच्या निमित्ताने समोर आला. कोल्हे यांनी विधानसभेच्या पराभवाचा गणेशनगर साखर कारखान्यात वचपा काढल्याचे बोलले जात आहे. वाचा - आज निवडणुका झाल्या तर ठाकरे गटाला किती जागा, राष्ट्रवादी-काँग्रेसचं काय? विखे पाटलांच्या मतदारसंघातील शिर्डी, राहाता, अस्तगाव आणी गणेशनगर परीसरील मतदारांनी विरोधात मतदान करत विखे पाटलांना मोठा धक्का दिला बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात विरोधात झालेले मतदान विखे पाटलांची चिंता वाढवणारे ठरणार आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या आशा पल्लवित करणारे ठरणार आहे. संजिवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे हे भाजपचे आहे. भाजपच्या विवेक कोल्हे यांनी मदत केल्यामुळे विखेंचा पराभल झाल्याचे बोलले जात आहे.