थोरातांनी व्यक्त केली मोठी शंका
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 24 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत मोठी शंका व्यक्त केली आहे. खारघर दुर्घटनेत अधिकजण बळी पडलेत, जो आकडा सांगितला जातोय त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्याची शंका बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत थोरात यांनी मोठी मागणी केली आहे.
घटनेची जबाबदारी स्विकारून सरकारने राजीनामा द्यावा : थोरात खारघर घटनेत मृतांचा आकडा मोठा असण्याची शंका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले. मग बसण्यासाठी सावलीची व्यवस्था का केली नाही. मृतांच्या पोटात अन्न आणी पाणी नव्हतं. या घटनेला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. याची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या घटनेच्या चर्चेसाठी दोन दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात यावे, अशा मागण्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत. महाविकास आघाडी अखंड : थोरात अजित पवार यांची चर्चा सुरू आहे. मात्र, महाविकास आघडीला अनुकूल वातावरण असताना कोणी सोडून जाणार नाही. आम्ही एकत्र काम करतोय. आणि मी राष्ट्रवादी सोडणार नाही हे स्पष्ट केलं असल्याचे थोरात यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना थोरात म्हणाले, राऊत दिल्लीत जास्त असतात. त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा लवकरच अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांच सरकार कोसळण्याच वक्तव्य असावं अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवार ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या वक्तव्यावबाबत उत्तर देण्यात ते सक्षम असल्याचे म्हणत पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास थोरातांनी नकार दिला. वाचा - …तोपर्यंत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर नको, हायकोर्टाचे आदेश कशी घडली घटना? आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं. या कार्यक्रमात आलेल्या 14 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, यातील काही मृत्यू चेंगराचेंगरीने झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.