JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, अजित पवार करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा ', आमदाराचा दावा

'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, अजित पवार करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा ', आमदाराचा दावा

अमोल मिटकरी यांनी असा दावा केला आहे, की विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे

जाहिरात

Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी 04 नोव्हेंबर : अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. मात्र, हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातो. असाच दावा आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय चिंतन शिबीर सुरू होत आहे. यासाठी अनेक नेते याठिकाणी आले आहे. अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना कात्री, चंद्रकांत पाटील म्हणतात ‘ते नाराज होणार नाही कारण..’ शिर्डीमध्ये प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी असा दावा केला आहे, की विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि तेच शासकीय पुजा करतील, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच यावेळी ते म्हणाले, की अजित दादांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे आता येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा त्यांनी केला आहे. फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मिटकरी फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, की ‘फडणवीस हे भविष्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदीही दिसणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील मोठा पक्ष आहे’. याआधी गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्यातील सरकार कोसळणार असल्चाचं भाकीत केलं होतं. राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार आहे, असं ते म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या