JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विखे विरुद्ध थोरात, नगरचं राजकारण पुन्हा जोरात! मैदानात उतरत विखेंचा अधिकारी-कंत्राटदारांना दम

विखे विरुद्ध थोरात, नगरचं राजकारण पुन्हा जोरात! मैदानात उतरत विखेंचा अधिकारी-कंत्राटदारांना दम

नगरच्या राजकारणात विखे विरुद्ध थोरात यांच्यात कायमच संघर्ष बघायला मिळाला आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

जाहिरात

राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात संघर्ष

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरीष दिमोटे, प्रतिनधी अहमदनगर, 19 मार्च : नगरच्या राजकारणात विखे विरुद्ध थोरात यांच्यात कायमच संघर्ष बघायला मिळाला आहे, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात घेतलेल्या आढावा बैठकीत कंत्राटदार आणी अधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलंय, यामुळे विखे पाटील आणी थोरातांचा संघर्ष पुन्हा बघायला मिळतोय. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणी राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय युद्ध सर्वश्रृत आहेच. महसुलमंत्री झाल्यानंतर विखे पाटलांनी थोरातांच्या मतदारसंघात अनअधिकृतपणे सुरू असलेल्या दगडखाणीवर कारवाई करत तब्बल 765 कोटी रूपये दंड ठोठावला आहे, त्यामुळे विखे पाटील आणी थोरातांचा पुन्हा राजकीय संघर्ष सुरू झालाय. विखे पाटील यांनी थोरातांच्या मतदारसंघात आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी कामाचे कत्राट घेणारांना चांगलंच फैलावर घेतलंय. या अगोदर तुम्हाला कंत्राट कसे आणी कुणी मिळवून दिले हे जाहिरपण मला सांगायला लावू नका. आम्ही आमचे मालक आहोत या भ्रमात तुम्ही राहू नका असा सज्जड दम विखेंनी भरलाय. कंत्राटदारांनी आमच्या राजकारणाच्या भानगडीत पडू नये ते आमचं काम आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्याला काही होणार नाही तर तुमचा भ्रम मी लगेच दूर करू शकतो, असा इशारा विखे पाटील यांनी दिलाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे कंत्राटदार आणी अधिकाऱ्यांना अशा प्रकारे धमकावणे चुकीचं असून आपल्या बगलबच्च्यांना विचारत चला, असा आग्रह धरताना दिसताहेत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या