(फोटो- लोकमत)
मिरज, 05 जानेवारी: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजेत एका सराईत गुंडाची निर्घृण हत्या (Criminal’s brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिरजेतील दोन जणांनी अवघ्या 200 रुपयांसाठी (Murder for 200 rupees) गळ्यावर लोखंडी सळईने घाव (Attack with iron rod) घालून हत्या केली आहे. ही घटना मृत गुंडाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या (Accused arrested) आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. योगेश हणमंत शिंदे असं हत्या झालेल्या 28 वर्षीय युवकाचं नाव आहे. तो मूळचा इचलकरंजी येथील रहिवासी असून तो दोन हत्येच्या गुन्ह्यांमध्ये मुख्य संशयित आरोपी आहे. पण चार महिन्यांपूर्वी तुरुंगातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मिरजेत आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. तर सलीम ग्यासुद्दीन सय्यद आणि प्रकाश अनिल पवार असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. दोन्ही आरोपी मिरजेतील रहिवासी आहेत. हेही वाचा- अल्पवयीन मुलांकडून सिनेस्टाईल खून; दुकानात लपलेल्या तरुणाला रस्त्यावर आणून ठेचलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत योगेश शिंदे पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार होऊन मिरजेतील एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. वेटरचं काम केल्यानंतर तो आरोपी सलीम सय्यद आणि प्रकाश पवार यांच्यासमवेत रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या बिस्कीट पॅकिंग करून ते विक्रीचं काम देखील करत होता. घटनेच्या दिवशी सोमवारी रात्री तिघेजण एकत्र बसून दारू प्यायले होते. दारू पिल्यानंतर आरोपींनी हिशोबातील दोनशे रुपये योगेशकडे मागितले. तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असल्याने वाद वाढत गेला. हेही वाचा- Nagpur: माहेरी आली अन् सख्ख्या भावाची ठरली बळी; बहिणीचा तडफडून झाला मृत्यू यावेळी यागेशने ‘मी दोन खून केले आहेत, तुम्हालाही संपवून टाकीन’ अशी धमकी दिली. यावेळी बाहेरचा कोणीतरी मिरजेत येऊन आपल्याला धमकी देतोय, हे पाहून आरोपी सय्यद आणि पवार यांना राग अनावर झाला. याच कारणातून आरोपींनी बाजूला पडलेल्या सळईने योगेशच्या गळ्यावर जोरदार हल्ला केला. हा हल्ला इतका भयावह होता की योगेशचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना योगेशच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडली. या घटनेनंतर योगेशच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.