JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मॉलमध्ये दोन वर्षाच्या चिमुरड्याची किंचाळी ऐकून धावले आई-बाबा, तोपर्यंत..

मॉलमध्ये दोन वर्षाच्या चिमुरड्याची किंचाळी ऐकून धावले आई-बाबा, तोपर्यंत..

शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना आपल्या मुलांकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे एका घटनेवरून समोर आले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई,27 फेब्रुवारी:**शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना आपल्या मुलांकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तर मोठी दुर्घटना होऊ शकते, हे एका घटनेवरून समोर आले आहे. मॉलमध्ये सरकत्या जिन्यात (एस्केलेटर) अडकून दीड वर्षाच्या चिमुरड्याला हाताची तीन बोटे गमवावी लागली. मुलुंडमधील आर मॉलमध्ये ही घटना घटली. मिळालेली माहिती अशी की, भांडूप येथे राहणारे रवींद्र राजीवडे आपल्या कुटुंबीयांसोबत मुलुंड येथील आर मॉलमध्ये आले होते. मॉलमध्य रवींद्र राजीवडे यांचा दोन वर्षीय मुलगा चिन्मय त्यांची नजर चुकवून एस्केलेटरकडे गेला. एस्केलेटरवर चढत असताना तो पडला. चिन्मयची किंचाळी ऐकून त्याचे आई-बाबा त्याच्याकडे धावले तोपर्यंत त्याचा हात एस्केलेटरमध्ये अडकून त्याच्या तीन बोटे तुटली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. भगवानगडावर चोरी, बाबांच्या वापरातील रायफल गेली चोरीला रवींद्र राजीवडे ऑटो चालक आहेत. त्यांनी सांगितले की, मुलुंडमधील आर मॉलच्या फूड कोर्टात नाश्ता केल्यानंतर ते ग्राऊंड फ्लोअरवर गेले. या दरम्यान, रवींद्र यांची पत्नी एका दुकानात खरेदी करत होती. चिन्मय देखील तिच्याकडे होता. अचानक चिन्मय नजर चुकवून एस्केलेटरकडे गेला. तो एस्केलेटरवर चढत असताना तो पडला. या दरम्यान चिन्मयची किंचाळी ऐकून रवींद्र यांच्यासह त्यांची पत्नी त्याच्या दिशेने धावले. परंतु तोपर्यंत चिन्मयच्या हाताची तीन बोटे तुटली होती. Alert! हवामान बदलणार; राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबर काही ठिकाणी विजांसह होणार वादळी पाऊस तातडीने चिन्मयला प्लेटिनम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु त्यांनी उपचारास असमर्थता दर्शवली. नंतर त्याला मुलुंड येथील राज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. चिन्मयच्या हातला तब्बल 25 टाके टाकण्यात आले आहेत. आता सध्या चिन्मयवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित चिन्मयच्या नातेवाईकांनी याबाबत मुलुंड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवी सरदेसाई यांनी सांगितले की, मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. या घटनेत मॉल प्रशासनाची चूक आहे का, हे पाहून त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. श्वसनलिकेत अडकला शेंगदाणा, अडीच वर्षांच्या सृष्टीचा गुदमरून मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या