JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 25 फूट खड्ड्यात पडून अपघात; प्रसंगावधान राखत मजूरांना बाहेर काढलं

25 फूट खड्ड्यात पडून अपघात; प्रसंगावधान राखत मजूरांना बाहेर काढलं

25 फूट खोल खड्ड्यात पडल्यानंतर मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. दबल्या गेलेल्या मजूरांना प्रसंगावधान राखत, ढिगारा बाजूला काढून बाहेर काढण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 12 फेब्रुवारी : ड्रेनेज लाईनचं खोदकाम करताना 2 मजूर 25 फूट खड्ड्यात पडून अपघात झाल्याची घटना घडली आहे. 25 फूट खोल खड्ड्यात पडल्यानंतर मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. दबल्या गेलेल्या मजूरांना प्रसंगावधान राखत, ढिगारा बाजूला काढून बाहेर काढण्यात आलं आहे. 25 फूट खड्ड्यात पडलेल्या या मजूरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिलं आहे. नाशिकरोड परिसरात ही घटना घडली. जेसीपीच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं.

संबंधित बातम्या

(वाचा -  विठुरायाचं दर्शनही झालं नाही…पंढरपूरमध्ये पोहोचण्यापूर्वी अपघात,4 जण जागीच ठार )

मजूरावर मातीचा संपूर्ण ढिगारा आल्याने मजूर ढिगाऱ्याखाली दबला गेला होता. अनेक लोकांच्या मदतीने, मातीचा ढिगारा बाजूला करत मजूराला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या