आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.
परभणी, 01 जानेवारी: परभणी (Parbhani) शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाची धारदार शस्त्राने हल्ला (Attack with sharpen weapon) करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या हत्येच्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात संबंधित तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येची ही थरारक घटना समोर येताच पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- रुग्णालयात अल्पवयीन मुलीसोबत अनोळखी तरुणाचे अश्लील चाळे, आधी मिठी मारली मग… नाविद असं हत्या झालेल्या 17 वर्षीय युवकाचं नाव असून तो शहरातील भोईगल्ली परिसरातील रहिवासी आहे. आज सकाळी परभणी शहरातील दर्गा रस्त्यावरील कालव्याच्या परिसरात नाविदचा मृतदेह आढळला आहे. नाविदचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हेही वाचा- 5 जण रिक्षातून करत होते प्रवास, एकाने अचानक चालकाच्या नरडीला लावला सुरा अन्…; पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या अधारे चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मृत नाविद याची नेमक्या कोणत्या कारणातून हत्या झाली? याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. चारही आरोपींची कसून चौकशी केली जात असून हत्येच्या नेमक्या कारणाचा तपास केला जात आहे.