JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भारत जोडो यात्रेतील एकाचा अपघातात मृत्यू; 'एक सच्चा साथीदार आणि...', राहुल गांधी भावुक

भारत जोडो यात्रेतील एकाचा अपघातात मृत्यू; 'एक सच्चा साथीदार आणि...', राहुल गांधी भावुक

भारत जोडो यात्रेतील दोघांना आयचर ट्रकने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा जखमी झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड 11 नोव्हेंबर : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं आहे. दरम्यान आता या यात्रेदरम्यान नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भारत जोडो यात्रेतील दोघांना आयचर ट्रकने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा जखमी झाला आहे. काय सांगता! भारत जोडो यात्रेसाठी एअर इंडियाच्या नोकरीवर पाणी, कोण आहे ही मराठी तरुणी? नांदेड - नागपूर मार्गावरील पिंपळगाव जवळ गुरुवारी रात्री हा अपघात झाला. राहुल गांधी यांची सभा आटोपून यात्रेकरू मुक्काम स्थळी जात होते. मात्र, पिंपळगावजवळ एका भरधावत आयचरने दोघांना धडक दिली . यात 62 वर्षीय गणेशन यांचा मृत्यू झाला. घटनेतील मयत गणेशन हे तमिळनाडूचे राहिवाशी होते. अपघातात सयसूल नामक व्यक्ती जखमी झाला आहे.

यापूर्वी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कृष्ण कुमार पांडे नावाच्या एका पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. नांदेडमध्ये पाच दिवसात दोन वेगवेळ्या घटनांमध्ये दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज पदयात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी आणि भारत यात्रींनी मयत गणेशन यांना श्रद्धाजली दिली. शिवाय फेसबुकवरून राहूल गांधी यांनी गणेशन यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. काल राहुल गांधींना भेटला अन् आज त्याचं स्वप्न पूर्ण, काँग्रेस अध्यक्षांकडून मुलाला अनोखी भेटवस्तू राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की ‘ते काँग्रेसचे कटिबद्ध कार्यकर्ते होते, त्यांनी गेल्या ३ दशकात पक्षाच्या प्रत्येक यात्रेत आणि प्रचारात भाग घेतला होता. त्यांच्या जाण्याने पक्षाचा एक सच्चा सैनिक आणि भारत जोडो यात्रेतील लाडका साथीदार गमावला आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या