JOIN US
मराठी बातम्या / लव स्टोरी / प्रेमासाठी बांगलादेशी तरुणीची आधी नदीत उडी, नंतर जंगलातून प्रवास, भारतीय प्रियकराला भेटली खरी पण..

प्रेमासाठी बांगलादेशी तरुणीची आधी नदीत उडी, नंतर जंगलातून प्रवास, भारतीय प्रियकराला भेटली खरी पण..

Love Story: बांगलादेशातील एका मुलीने प्रेमासाठी पराक्रमच केला असं म्हणावं लागेल. कारण, प्रियकराला भेटण्यासाठी सीमा ओलांडून ती भारतात आली.

जाहिरात

सांकेतिक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 जून : प्रेमासाठी (Love) काही पण असं अनेकदा विनोदाने म्हटलं जातं; पण अनेकजण प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी ठेवतात आणि ते करूनही दाखवतात. प्रेमात पडल्यानंतर कधी कोण काय करेल, याचा काही नेम नाही. प्रेमाला कोणतंच बंधन आणि कोणतीच सीमा नसते, असंही म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आलाय. एक तरुणी आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी बांगलादेशातून भारतात (Girl Travelled from Bangladesh To India to marry Boyfriend) पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे या 22 वर्षीय तरुणीने नदीतून पोहून भारतीय सीमा (India Bangladesh Border) ओलांडली. याशिवाय या मुलीने सुंदरबनचं (Sundarbans) घनदाट जंगलही पार केलं. कृष्णा मंडल नावाच्या या तरुणीची सध्या चांगलीच चर्चा आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाची सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर (Facebook) नरेंद्रपूर परिसरातील अभिक मंडल नावाच्या तरुणाशी ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात (Love) पडले. त्यानंतर कृष्णाने अभिकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाला अभिकला भेटायची ओढ निर्माण झाली. परंतु, अभिकला भेटायला येण्यासाठी कृष्णाजवळ वैध पासपोर्ट (Passport) नव्हता, त्यामुळे ती मिळेल त्या वाटेने निघाली. त्यासाठी तिने पोहून नदी पार केली आणि तिने सुंदरबन हे वाघांचा अधिवास असलेलं घनदाट जंगलही पार केलं. रॉयल बंगाल टायगर्ससाठी (Royal Bengal Tigers) प्रसिद्ध असलेल्या सुंदरबनमध्ये बांगलादेशमधून सर्वांत प्रथम कृष्णाने प्रवेश केल्याचा पोलीस सूत्रांचा दावा आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. ऐकावं तेवढं नवलच! चक्क स्वतःचा घाम विकून TV स्टार कमावतेय लाखो रुपये; फॅन्सही आहेत घामवेडे सुंदरबनमध्ये पोहोचल्यानंतर तिला जिथं पोहोचायचं होतं, तिथं जाण्यासाठी ती आणखी तासभर पोहत राहिली. त्यानंतर कृष्णाला तिचा प्रियकर अभिक भेटला आणि नंतर दोघांनी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात (Kalighat Temple Kolkata) लग्नगाठ बांधली. यादरम्यान नरेंद्रपूर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी कृष्णाला पोलिसांकडून सोमवारी अटक करण्यात आली. कृष्णाला आता बांगलादेश उच्चायुक्तांकडे (Bangladesh High Commission) सोपवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. कृष्णा मंडलच्या या कृत्याने खरंच प्रेमासाठी लोक काहीही करू शकतात याची प्रचिती आली आहे. तिने भारतात अवैधरित्या प्रवेश केला असला तरी तिच्या या हिमतीचं सोशल मीडियावर युजर्स कौतुक करत आहेत. प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडणारी कृष्णा ही पहिली व्यक्ती नाही. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला भेटण्यासाठी प्रेमवेड्यांनी देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या