JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हाला माहीत आहे? व्यक्तीच्या दिसण्यावरून-उंचीवरूनही ओळखू शकता त्याचा स्वभाव

तुम्हाला माहीत आहे? व्यक्तीच्या दिसण्यावरून-उंचीवरूनही ओळखू शकता त्याचा स्वभाव

एखाद्या व्यक्तीला दुरून बघूनच त्याचा स्वभाव कसा असेल, हे कळू शकतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे त्याच्या उंचीवरून ओळखता येतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मार्च : अनेकदा एखाद्या व्यक्तीचे हावभाव, राहणीमान इत्यादी पाहून आपल्याला ती व्यक्ती कशी असेल याची कल्पना येते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) कुंडली व्यतिरिक्त, एखाद्याचं कपाळ पाहून, चेहरा, हात, पाय आणि हाताच्या रेषा पाहून आपल्याला त्याच्याबद्दल बरंच काही कळतं. पण तुम्हाला माहीत आहे का, की एखाद्या व्यक्तीचा उंची, अंगकाठीही खूप काही सांगून जाते. हस्तरेषाशास्त्र (Palmistry) आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये (Samudrika Shastra) सांगितलंय की, एखाद्या व्यक्तीची उंची पाहूनही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा आणि सवयींचा अंदाज लावता येतो. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीला दुरून बघूनच त्याचा स्वभाव कसा असेल, हे कळू शकतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, हे त्याच्या उंचीवरून ओळखता येतं. कमी उंचीचे लोक कमी उंचीचे लोक स्वभावानं अतिशय व्यावहारिक असतात. ते आपल्या बोलण्यानं कोणाचंही मन जिंकतात. त्यांच्या गोड बोलण्यात तुम्ही इतके गुरफटून जाल की, त्यांच्या मनात काय चाललं असेल, याचा अंदाजही येणार नाही. अशा परिस्थितीत हे लोक कोणालाही सहज फसवू शकतात. त्यामुळं या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. पैशाच्या बाबतीत ते खूप कंजूष असतात. सामान्य उंचीचे लोक सामान्य उंचीच्या लोकांचा स्वभाव बऱ्यापैकी स्थिर असतो. ते सर्व काही संतुलन राखून करतात. कोणतंही काम करण्यापूर्वी ते दोन्ही बाजूंचा विचार करतात, त्यानंतरच निर्णय घेतात. हे लोक मेहनती, सद्गुणी, बुद्धिमान असतात. त्यांच्या हातात कोणतीही जबाबदारी घेतली तर ते प्रामाणिकपणे पार पाडतात. कोणत्याही परिस्थितीत संयम बाळगणं त्यांना चांगलं ठाऊक असतं. त्यांना खूप लवकर राग येतो. पण जर कोणी त्यांच्या चुकीबद्दल त्यांची माफी मागितली तर ते मनातून त्यांचा राग काढून टाकून त्यांना क्षमाही करतात. त्यांना बहुतेक आयुष्यात खूप संघर्ष असतो. हे वाचा -  घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही या गोष्टी ठेवू नका; सगळ्या कामांची होते वाताहात उंच लोक उंच उंचीचे लोक अनेकदा मौजमजा करणारे, खुशाल स्वभावाचे असतात. ते स्वतःला आनंदी ठेवतात आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्यांनाही आनंदी ठेवतात. या लोकांचं बोलणंही चांगलं असतं आणि त्यांचं काम ते अगदी सहज करून घेतात. या लोकांना चांगले कपडे घालणं आवडतं. हे लोक सहजासहजी कोणत्याही दबावात येत नाहीत. हे वाचा -  तगडा बँक बॅलन्स, पैसा-गाडी सगळं होत्याचं नव्हतं होतं; या 3 चुका कंगाल बनवतात (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या