मुंबई, 21 जून : भुजंगासन, उष्ट्रासन, गोमुखासन असे प्राण्यांच्या नावावरून बरीच योगासनं (yoga poses) आपल्याला माहिती आहेत. त्या त्या प्राण्याच्या वैशिष्ट्यावरून आणि योगाच्या प्रकारावरून योगासनांना ही नावं देण्यात आली. मात्र योगासनांना प्राण्यांची नावं देण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष प्राण्यांसहदेखील योगा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरच्या घरी योगा करताना तुमच्या घरात कुत्रा, मांजर असा एखादा पाळीव प्राणी असेल तर तुम्हाला याचा अनुभव आलाच असेल. हे प्राणीदेखील तुमच्यासह योगाचा आनंद घेतात. विशेष म्हणजे प्राण्यांसह योगा करताना तुम्हालाही खूप बरं वाटतं. उलट योगा करण्यास तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळतं.
आता हाच व्हिडीओ पाहा ही तरुणी आपल्या मांजरीसह योगा करत आहेत. विशेष म्हणजे ही मांजर तिच्या योगामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करत नाही उलट ती मदतच करते आहे. हे वाचा - मोदींचा Yoga Day यावर्षी डिजिटल; सोशल मीडियावर अवतरले नवे इमोजी हे फक्त एका घरातील चित्र आहे. मात्र बहुतेक योगा क्लासेसमध्येदेखील असं दृश्य पाहाया मिळेल. असे बरेच योगा क्लासेस आहे, जिथं प्राण्यांसह योगा केला जातो. हा गोट योगा ( goat yoga) तुम्ही पाहिलात का? बकऱ्यांसह योगा केला जातो. स्ट्रेस थेरेपी म्हणून या योगाला सध्या प्राधान्य दिलं जातं आहे.
अशाच पद्धतीने बनी योगा क्लासेस आहे. जिथं योगा क्लासेसमध्ये तुमच्या जोडीला योगा करण्यासाठी ससे असतात. असे योगा क्लासेस काही मोजक्याच ठिकाणी आहेत.
तर तुमच्याकडेदेखील असा एखादा प्राणी असेल तर त्यासह तुम्ही योगा करू शकता आणि तन-मन हेल्दी बनवू शकता. संपादन - प्रिया लाड