JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या तारखेला साजरा होणार जागतिक लसीकरण सप्ताह, काय आहे थीम, कशी झाली सुरुवात?

या तारखेला साजरा होणार जागतिक लसीकरण सप्ताह, काय आहे थीम, कशी झाली सुरुवात?

World Immunization Week: जागतिक लसीकरण सप्ताह दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. यावेळी 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे. तो का साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 24 एप्रिल : जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात (24 ते 30 एप्रिल) जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो. या संपूर्ण आठवड्यात लोकांना रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लसींची भूमिका आणि महत्त्व सांगितले जाते. लसीबाबत लोकांमध्ये असलेला संकोच दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. WHO, या संपूर्ण आठवड्यात, लसीकरणाच्या महत्त्वाविषयी प्रबोधन करते आणि देशातील सरकारांना या दिशेने आवश्यक पावले उचलण्यास सांगतात. काय आहे यंदाची थीम या वर्षीच्या जागतिक लसीकरण सप्ताहाची (World Immunization Week) थीम सर्वांसाठी दीर्घायुष्य (Long Life for All) आहे. लसींद्वारे लोक दीर्घकाळ कसे जगू शकतात आणि निरोगी जीवन कसे जगू शकतात हे लोकांना सांगणे हा या थीमचा उद्देश आहे. Lung health: फुफ्फुसांवर थेट परिणाम करतात या 5 गोष्टी; वेळ निघून जाण्यापूर्वी त्यांची काळजी घ्या युनिसेफ (UNICEF), गावी (Gavi), द व्हॅक्सिन अलायन्स, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन हे देखील WHO सोबत जागतिक लसीकरण सप्ताह साजरा करत आहेत. जागतिक लसीकरण सप्ताहाचे महत्त्व लसीकरणाद्वारे दरवर्षी लाखो आणि करोडो जीव वाचवले जातात. असं असूनही जगभरात सुमारे 2 कोटी मुलांना दरवर्षी लस मिळत नाही. त्याअभावी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. ही आकडेवारी युनिसेफची आहे. जागतिक आरोग्य संघटना वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे लोकांना लसीकरणाचे महत्त्व सांगते आणि त्यांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करते. कोरोनासारख्या महामारीच्या काळात हे अधिक महत्त्वाचे ठरते. कशी झाली सुरुवात? 2012 पूर्वी लसीकरण सप्ताहाचे उपक्रम जगातील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जात होते. त्यानंतर मे 2012 मध्ये जागतिक आरोग्य सभेने आपल्या बैठकीत जागतिक लसीकरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच 2012 मध्ये प्रथमच एकाच वेळी लसीकरण सप्ताह साजरा करण्यात आला ज्यामध्ये जगभरातील 180 हून अधिक देश सहभागी झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या