मुंबई, 5 नोव्हेंबर : हिवाळा हा असा ऋतू आहे, ज्यावेळी आपल्याला तुलनात्मकपणे जास्त आळस येतो. थंडी सुरु झाली की, आपल्याला ब्लँकेटमधून बाहेरच यावेसे वाटत नाही. काही लोकांसाठी सकाळी लवकर उठणं हे तर हिवाळ्यातील सर्वात अवघड काम असतं. मात्र हिवाळ्यातच असं का होतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हिवाळ्यात आपल्याला जास्त आळस का येतो आणि त्यापासून वाचण्याचे काही उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विज्ञानानुसार, हिवाळ्यातील सुस्तीचा हवामानाशी संबंध आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात दिवस लहान असतात आणि थंड भागात, सूर्य क्वचितच दिसतो. सूर्यप्रकाश थेट तुमच्या उत्पादकता आणि आनंदाच्या पातळीशी जोडलेला आहे. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या पातळीत बदल होतो.
Kuhlad Chai Benefits : फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असतो कुल्हड चहा; पाहा काय आहेत फायदेसेरोटोनिन हे एक आनंदी संप्रेरक म्हणजेच हॅपी हार्मोन आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, या बदलांमुळे तुमची ऊर्जेची पातळी कमी होते. त्याचबरोबर तुम्ही इतरवेळी आवडीने करत असलेल्या गोष्टींमध्येही तुम्हाला रस वाटत नाही. आळशीपणा आणि ब्लँकेटमध्ये झोपून राहण्याची इच्छा तुमच्यावर जास्त प्रभाव करते.
हिवाळ्यातील अळशीपणापासून वाचण्यासाठी उपाय - हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला काम असेल आणि त्यादरम्यान तुम्हाला थंडीमध्ये आळस जरी आला. तरी थोड्याशा काळासाठीही ब्लँकेटमध्ये झोपणे टाळा. थोडा वेळासाठी ब्लॅंकेटमध्ये झोपल्यानंतर तुम्हाला त्यातून बाहेर यावेसे वाटणार नाही आणि असा किती वेळ निघून जाईल हे कळणारही नाही. त्यामुळे किम असताना हे टाळा. - सकाळी उठण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. पण त्यांच्यासाठीही हिवाळ्यात सकाळी लवकर उठणे थोडे अवघड होऊ शकते. हिवाळ्यात आपल्याला ब्लँकेटमध्ये छान झोप लागते आणि बऱ्याचदा वेळेचा अंदाज येत नाही. मग साहजिकच उठायला उशीर होतो आणि पुढची सर्व कामं उशीरा होतात. म्हणूनच हिवाळ्यात अलार्म लावून झोपणे कधीही उत्तम. तसेच अलार्मचा आवाजही थोडा जास्तच असावा. जेणेकरून तुम्हाला लवकर जग येईल. - सकाळी उठल्यानंतरही शरीरात आळस राहतोच अशावेळी उठल्याबरोबर घराची दारं खिडक्या उघडा. प्रकाश आणि उन्हामुळे तुमचा आलास लवकर दूर होईल. कारण बऱ्याचदा अंधार असला की आपल्याला झोप येऊ लागते. चांगलं पचन होण्यासाठी या कुशीवर झोपा; पोटाचं पण आरोग्य राहतं, जळजळही थांबेल - पूर्णपणे फ्रेश आणि उर्जावान होण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. कितीही कंटाळा आला. तरी हिवाळ्यात तुमचे व्यायामाचे रुटीन सुरु ठेवा. त्यात अजिबात खंड पडू देऊ नका. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर व्यायामाला सुरुवात करा.