मुंबई, 27 एप्रिल : गर्भवती महिलेची गर्भधारणेदरम्यान एखादी गोष्ट खाण्याची इच्छा अपूर्ण राहिली तर तिचे बाळ लाळ गाळते (Drooling), असे म्हणतात. ही समजूत भारतात फार पूर्वीपासून प्रचलित आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या या मागचे खरे कारण काही वेगळेच आहे. लहान मुलांच्या तोंडातून लाळ गळणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया 3 महिन्यांपासून बाळांमध्ये सुरू (child care tips) होते. जेव्हा मूल 2 वर्षांचे होऊन सुद्धा त्याच्या तोंडातून लाळ टपकत असते, तेव्हा मुलांची लाळ चिंतेची बाब बनते. अशा स्थितीत चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुलावर उपचार करावेत. मुलांमध्ये लाळेची कारणे - मुलांच्या तोंडातून लाळ गळण्याची अनेक कारणे असू शकतात. तोंडात दात येणे, हिरड्या घट्ट होणे, लाळ ग्रंथी विकसित होणे. या सर्वांशिवाय, मुलांना कसे गिळायचे हे माहित नसते, ज्यामुळे त्यांची लाळ गळते. तज्ज्ञांच्या मते, मुलांची लाळ टपकणे हे त्यांच्या योग्य विकासाचे लक्षण मानले जाते. हे वाचा - OMG! ‘सुपर से भी ऊपर’ आजीबाई; वयाच्या 99 व्या वर्षी उडवलं प्लेन; पाहा VIDEO लाळ येणे कसे थांबवायचे - मुलं लाळ गाळणं सर्वसामान्य गोष्ट आहे. आपण त्यांच्या कपड्यांवर रुमाल वापरू शकता. जेव्हा मुलाला गोष्टी समजू लागतात, तेव्हा तुम्ही त्याला समजावून सांगू शकता की लाळ गाळू नये. ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी तुम्हाला थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. हळूहळू, जेव्हा मुलांना समजू लागते आणि ते लाळ गाळणे कमी करतात. हे वाचा - World Malaria Day: मलेरिया जीवघेणा ठरू शकतो; आयुर्वेदिक उपचारांनी अशी घ्या काळजी डॉक्टरांशी संपर्क साधा - मुलांचे दात येण्याचे वय 8 ते 9 महिन्यांच्या दरम्यान आहे, परंतु 3 महिन्यांपासून बाळाला लाळ गळायला सुरुवात होते. जर तुमचे मूल 2 वर्षांचे झाल्यानंतरही लाळ गाळणे थांबवत नसेल, तर वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चांगल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)