नवी दिल्ली, 10 जून : काळ्या केसांमुळे (Black Hairs) माणसाचं सौंदर्य खुलतं. केसांचा नैसर्गिक रंग आपल्या चेहऱ्यासाठी अधिक सुंदर (Beautiful) वाटतो. हे खरं असलं, तरी आता हे सर्वांनाच शक्य नसतं. कारण सध्या केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे. पूर्वी पांढरे केस (White Hairs) हे म्हातारपणाचं लक्षण होतं. कारण ठरावीक वयानंतर हळूहळू केस पांढरे होऊ लागत होते. आता मात्र पांढरे केस हा लूक्सचा एक भाग झाला आहे. फॅशन आणि स्टाइल स्टेटमेंट म्हणून केस पांढरेच ठेवण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. लहान वयात केस पांढरे होणं हे त्यामागचं एक कारण आहे. केस पांढरे झाले, तर त्याला डाय, मेंदी किंवा हेअर कलर लावून हव्या त्या रंगाचे करता येतात; पण हे पर्याय केसांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. एखाद्याच्या केसांना रंग किंवा डाय मानवतही नाही. मग अशा वेळी एक तर केस पांढरेच ठेवण्याचा पर्याय असतो किंवा नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा मार्ग शोधावा लागतो. केस काळे करण्यासाठी स्वयंपाकघरातला एक असा पदार्थ हमखास मदत करू शकतो. याचा वापर आपण रोजच करतो. तो पदार्थ म्हणजे चहा पावडर. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपण रोज वापरतो, ती चहापावडर (Tea) नैसर्गिकरीत्या केस काळे करण्यासाठी फायदेशीर असतो. हा घरगुती उपाय अगदी आजीच्या काळापासून वापरला जात आहे. चहा पावडरला नैसर्गिक रंग (Natural Color) मानलं जातं. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात 5 चमचे चहा पावडर किंवा 6 टीबॅग्ज घाला. पाणी उकळल्यावर थंड होऊ द्या. मग हे पाणी केसांवर लावून 45 मिनिटं तसंच ठेवा. वाळल्यानंतर कोमट पाण्यानं केस धुऊन टाका. यामुळे केस थोडे काळे झाल्यासारखे दिसतील. याचा नियमित वापर केल्यानं केस बऱ्याच प्रमाणात काळे होतात. अजून चांगला परिणाम साधण्यासाठी चहा पावडरमध्ये 2 ते 3 चमचे कॉफी पावडर (Coffee) मिसळा. हे मिश्रण पंधरा मिनिटं उकळून थंड होऊ द्या. मग अर्धा तास केसांवर लावून धुऊन टाका. कॉफी पावडर मिसळल्यानं केसांना अधिक गडद (Dark Color) रंग येतो; मात्र केस धुताना शॅम्पूचा (Do Not Use Shampoo) वापर करू नका. त्यामुळे केसांचा रंग फिकट होण्याची शक्यता असते. केस अकाली पांढरे होण्यामुळं तरुणांना चारचौघात जायला लाज वाटते, आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे केस काळे करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते; पण खरा उपाय घरातच दडलेला आहे. स्वयंपाकघरातला चहा आणि कॉफी तब्येतीसाठी चांगली आहे की नाही, या वादात पडण्यापेक्षा केस काळे करण्यासाठी त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे?