मुंबई, 08 जुलै : अनेकांच्या घरात उंटांचा पुतळा आपण पाहिला असेल. राजस्थान व्यतिरिक्त देशातील इतर अनेक राज्यांमध्ये उंटाच्या मूर्ती घरात ठेवण्याची प्रथा आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार उंटाची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं. उंटाची जोडी घरात ठेवल्यामुळे प्रगती होते आणि कामात यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. उंट हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रम करणारा प्राणी मानला (Camel Vastu Tips) जातो. वास्तुशास्त्रात उंटाचे वर्णन कठोर परिश्रमाचे प्रतीक म्हणून केले आहे. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला करिअरमध्ये वारंवार अपयश येत असेल किंवा पैशाशी संबंधित समस्या सतत येत असतील, तर आपण घरात उंटाची मूर्ती ठेवू शकता. उंटाची जोडी ठेवण्यासाठी योग्य दिशा - घरामध्ये उंटाची मूर्ती जोडीने ठेवल्याने अनेक फायदे होतात. परंतु, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, मूर्ती घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा दिवाणखान्यात वायव्य दिशेला ठेवावी. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी - जर एखाद्या व्यक्तीच्या करिअरमध्ये सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात अशी उंटाची मूर्ती ठेवावी. हे वाचा - पांढऱ्या केसांना फक्त डाय करून भागणार नाही; आहारात हे पदार्थ घेताय का पाहा फेंग शुईनुसार - चिनी वास्तुशास्त्र ज्याला आपण फेंगशुई म्हणूनही ओळखतो, जोडीमध्ये असलेली उंटाची मूर्ती नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी खूप मदत करते. हे वाचा - हसत्या-खेळत्या घरात अनेक अडचणी वाढू शकतात; घराच्या परिसरात अशी झाडं नसावीत पैसा येण्याचा मार्ग मोकळा - उंटाची मूर्ती घरात ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सामान्य राहते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तसेच पैशांसंबंधीच्या अडचणी येत नाहीत. तसेच, जर उंटाची मूर्ती जोड्यांमध्ये ठेवली तर ती संपत्तीच्या आगमनासाठी नवीन मार्ग उघडते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)