JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घराचं बेसमेंट असं असायला हवं; बांधताना या 9 गोष्टींची काळजी घेतली की चिंता नाही

घराचं बेसमेंट असं असायला हवं; बांधताना या 9 गोष्टींची काळजी घेतली की चिंता नाही

घराच्या आत तळघर बांधायचे (Basement tips) असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया तिरुपतीचे ज्योतिषी आणि आर्किटेक्ट डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जून : वास्तुशास्त्रानुसार बेसमेंट (Basement) म्हणजेच तळघर हे घराच्या आत असू नये, असे सांगितले जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहू शकत नाही. या कारणास्तव, त्यामध्ये राहणारे लोक अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतात. सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा अनेक प्रकारचे आजार बरे करण्यासाठी गरजेची असते. मात्र, आजच्या काळात लोकसंख्या आणि महागाई वाढल्यामुळे लोकांना आपल्या आहे त्या जागेचा जास्तीत जास्त वापर करायचा असतो, म्हणून तळघर हे घराप्रमाणे बांधतात. वास्तूशास्त्रानुसार (Vastu) ते वास्तूशी सुसंगत मानलं जात नाही, तरीही घराच्या आत तळघर बांधायचे (Basement tips) असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया तिरुपतीचे ज्योतिषी आणि आर्किटेक्ट डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून. वास्तूशास्त्रानुसार तळघर कसे असावे? 1. पूर्व आणि उत्तर दिशेला तळघरात खिडक्या किंवा प्रकाशासाठी जागा ठेवणे चांगले. 2. तळमजल्यापासून एक चतुर्थांश तळघर उंच असावे, जेणेकरून शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश तळघरात येऊ शकेल. 3. तळघरात दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पारदर्शक काच, खिडक्या किंवा स्कायलाइट्स इत्यादी ठेवू नयेत. हे वास्तुशास्त्रीय नाही. 4. घराच्या आत तळघराचे बांधकाम चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम भागात करू नये. यासाठी पूर्व किंवा उत्तर भाग सर्वोत्तम मानला जातो. 5. तळघरात शक्यतो स्नानगृह आणि शौचालये बांधणे टाळावे. हे वाचा -   आवळ्याचा रिकाम्या पोटी करा असा उपयोग; वजनात लगेच दिसेल फरक 6. तळघर बनवताना घरातील ब्रह्म स्थान आणि वास्तुपुरुषाचे मुख्य स्थान याची काळजी घ्यावी. या भागांमध्ये तळघर नसावे. 7. झोपण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी तळघर वापरू नका. यामध्ये बेडरूम आणि किचन बनवणे योग्य मानलं जात नाही. हे वाचा -  मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहा 8. आपण बेसमेंट किंवा तळघर मध्ये साहित्य ठेवू शकता. गोदाम म्हणून या खोल्यांचा वापर केला जाऊ शकतो. 9. नेहमी लक्षात ठेवा की तळघर इतर घराप्रमाणे नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे, यामुळे नकारात्मकता पसरत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या