JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रस्त्यावरचा वडापाव की दुकानातील बर्गर; आरोग्यासाठी काय खाणं आहे फायदेशीर?

रस्त्यावरचा वडापाव की दुकानातील बर्गर; आरोग्यासाठी काय खाणं आहे फायदेशीर?

खरं तर हे दोन्ही प्रकारचं चित्र पाहून तुम्ही स्ट्रीट फूडला नकार देऊ शकता. पण या दोन्हींची तुलना करता काही गोष्टी समोर येतात. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.

जाहिरात

वडा पाव बर्गर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जानेवारी :  आजकाल घराबाहेरचे पदार्थ खाण्याकडे लोकांचा प्रचंड कल आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील गाड्यांवर जाऊन तेथील पदार्थांवर यथेच्छ ताव मारायला प्रत्येकाला आवडतं. काही लोक रोज बाहेरचे पदार्थ सेवन करतात. रस्त्यावरून जाताना कडेला थांबलेल्या डोसा, वडापाव, भेळ, पाणीपुरी आदी पदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्या आपण शहरांमध्ये सर्रास पाहतो. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मोठी हॉटेलं, कॅफे, रेस्टॉरंट, फूड आउटलेट्सची संख्यादेखील कमी नाही. या ठिकाणी पिझ्झा, सँडविच, बर्गर आदी पदार्थ खाणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. दरम्यान, भारतीय स्ट्रीट फूड हे अस्वच्छ आणि आरोग्यसाठी घातक असल्याचं बोललं जातं. त्या तुलनेत बर्गर, रेड वेल्वेट केक, पिझ्झा या गोष्टी झाकलेल्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवलेल्या असल्याने चांगल्या असतात, असं सांगितलं जातं. खरं तर हे दोन्ही प्रकारचं चित्र पाहून तुम्ही स्ट्रीट फूडला नकार देऊ शकता. पण या दोन्हींची तुलना करता काही गोष्टी समोर येतात. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया. खरंतर भारतीय स्ट्रीट फूडची नेहमीच बदनामी होते. हे पदार्थ अस्वच्छ, आरोग्यासाठी चांगले नाहीत, असं लहानपणापासून सांगितलं जातं. पण मग स्वच्छ ठिकाणी ठेवलेले आणि आकर्षक बर्गर, रेड वेल्वेट चीज केक आणि केक पॉप्सबाबत अशा पद्धतीची विधानं केली जात नाही. हे पदार्थ कॅफे, फूड आउटलेटमध्ये अशा पद्धतीनं ठेवलेले असतात की हे स्वच्छ आहेत, यावर आपला विश्वास बसतो. कप केकवर गुलाबजाम टाकून खाणं सर्वांनाच आवडतं. पण गुलाबजाम तयार करण्यासाठी वापरलेला खवा, साखर, तूप हे घटक कप केकच्या तुलनेत आरोग्यासाठी जास्त घातक असतात. पण तरीही आपण या गोष्टी आवडीनं खातो. आपण ज्या भारतीय स्ट्रीट फूडबद्दल बोलणार आहोत, त्यात समोसे, कचोरी, वडे, शेवपुरी, भजी आदींचा समावेश आहे. हेही वाचा - ब्लड शुगर नियंत्रित करण्यापासून कॅन्सरचाही धोका करते कमी, वाचा मलबेरीचे फायदे यात चीज बर्स्ट पिझ्झा, फ्राइड चिकन यांचा सामना करण्यासाठी विक्री करण्यात येणाऱ्या तंदुरी मोमोज किंवा चीज कुल्चाचा समावेश नाही. समोसे, कचोरी, वडे, शेवपुरी यासारख्या स्ट्रीट फूडवर प्रादेशिक गोष्टींचा प्रभाव आहे. ठिकाणांनुसार या पदार्थांची चव वेगवेगळी आहे. हे पदार्थ यांत्रिक पद्धतीने उत्पादित केलेले नसतात. त्यात इमल्सीफायर्स आणि रासायनिक अँटिऑक्सिडंट वापरले जात नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय स्ट्रीट फूडच्या तुलनेत प्रक्रिया केलेलं अन्न कितपत उपयुक्त आहे, असा प्रश्न अनेकदा पडतो. यापैकी काही पदार्थांचा प्रातिनिधीक स्वरुपात तुलनात्मक अभ्यास केला असता काही निष्कर्ष समोर येतात. हे निष्कर्ष कोणत्याही प्रयोगशाळेतील प्रयोगांचे नाहीत तर सामान्य ज्ञानाच्या आधारे मांडले आहेत. सर्वसामान्यपणे आपण गाडीवर किंवा साध्या दुकानात मिळणारी कुल्फी केव्हातरी खातोच. कुल्फीत आईस्क्रीम इतक्याच जास्त कॅलरीज असतात. पण कुल्फी नैसर्गिक पदार्थांपासून बनवली जाते. दुसरीकडे कमर्शिअल आईस्क्रीममध्ये कार्बोक्सी मिथाइल सेल्युलोज असते. त्यामुळे अल्प प्रमाणात जळजळीचा त्रास होतो आणि त्यातील घटकांमुळे आतड्यामधील जीवाणूंना हानी पोहोचते. हेही वाचा - Strawberry Benefits : वेट लॉससोबत हाडंही मजबूत करते स्ट्रॉबेरी, ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल! रेड वेल्वेट केक आणि गुलाबजामची तुलना केली असता, यातून कॅलरीज सेवनाची तुलना होऊ शकते. पण केकमधील खाण्यासाठी वापरले जाणारे रंग, हायड्रोजनेटेड फॅट्स किंवा रिफाइंड व्हेजिटेबल ऑईल या घटकांमुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो. केकमध्ये स्टेबल फ्रॉस्टींग असल्यास त्यात ट्रान्सफॅट्सचं प्रमाण जास्त असतं. रिअल फ्रॉस्टींग फार काळ टिकत नाही. पण गुलाबजाम टिकतो. यामुळे केकच्या तुकड्याचा आकार हा गुलाबजामपेक्षा तिप्पट आहे हे जाणून घेण्यास मदत होते. गुलाब जाम ही भारतातील सर्वात जड मिठाई समजली जाते. त्यामुळे तुम्ही कदाचित रसगुल्ला, श्रीखंड किंवा गाजर हलव्यापैकी एक पर्याय सहज निवडू शकता. कचोरीपेक्षा क्लब सँडविचला पसंती देणारे लोक कचोरीकडे जंक फूड म्हणून पाहतात. क्लब सँडविच बनवताना पालेभाज्या, फळभाज्यांचे बारीक काप वापरले जातात. पण यासाठी वापरलेला जाणारा ब्रेड मैद्यापासून बनलेला असतो. तसेच यात मेयोनिजचे प्रमाणही जास्त असते. मात्र कचोरीत मेयोनिज वापरलं जात नाही. त्यासोबत हिरव्या चटणीचा वापर प्राधान्याने होतो. या चटणीकडे लोक दुर्लक्ष करतात. पण यात जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. कचोरी आणि चटणी हे कॉम्बिनेशन संतुलित ठरते. हेही वाचा - Roti Noodles : उरलेल्या पोळ्या फेकू नका, या सोप्या पद्धतीने बनवा हेल्दी-टेस्टी रोटी नूडल्स वडापाव आणि बर्गरची नेहमीच तुलना होते. खरंतर वडापाव हा गरीबांचा बर्गर मानला जातो. यात मैद्याचा वापर होत असला तरी तो आरोग्यासाठी त्रासदायक ठरतोच असं नाही. बटाट्याचा वडा हा ताज्या आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून बनवतात. त्या तुलनेत बर्गरच्या पॅटीत इमल्सीफायिंग घटक असतात. वड्यासोबत ताज्या आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तयार केलेल्या चटण्या दिल्या जातात. बर्गरवर ऑइल बेस्ड मेयोनिज आणि इनव्हर्ट सिरप लेस्ड केचप लावला जातो. पूर्वी समोसा खाताना जो एक प्रकारचा आनंद मिळायचा आज हीच गोष्ट फ्राइड चिकन खाल्ल्याने लोकांना मिळते. पण बऱ्याचदा कोंबडी अनुवंशिकरित्या सुधारित असते. जेव्हा तुम्ही फ्राइड चिकनसोबत समोसा खाता तेव्हा त्यात मैद्याचा काही अंश असतो. हे दोन्ही पदार्थ तयार करताना तेलाचा पुनर्वापर होतो.पण स्थानिक समोसा विक्रेत्याला बहुराष्ट्रीय चेन्सपेक्षा चांगले तेल वापरण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते. या बहुराष्ट्रीय कंपन्या बहुधा जनुकीय सुधारित तेल बियांपासून तयार केलेले तेल वापरतात. आपण काही वेळा थोडा चेंज म्हणून आइस्ड टी, कोल्ड कॉफी किंवा कुल्हडमधला चहा घेतो. पण कॉफीतील हेझलनट्स, आइस्ड टीवरील मँगो, ब्लूबेरीज हे फ्लेवर रासायनिक असतात. पण मलईयुक्त लस्सी, मसाला दूध, कु्ल्हडमधील चहा या सर्व गोष्टींमध्ये रासायनिक घटकांचा वापर टाळला जातो. या सर्व पदार्थांमधील तुलनात्मक घटक पाहता, स्ट्रीट फूड हे खरं आणि प्रामाणिकपणे तयार केलेलं असतं, असं समजायला हरकत नाही. त्यात औद्योगिकरित्या बनवलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांइतक्याच कॅलरीज असू शकतात. पण या स्ट्रीट फूडमुळे ज्यांची नावं देखील सामान्य लोकांना माहित नाहीत अशी असंख्य रसायनं आणि रासायनिक घटक शरीरात जात नाहीत. पेस्ट्री कितीही सिथेंटिक रंगांनी सजवली आणि आकर्षक बनवली तरी त्यातून आरोग्याला फायदा होतोच असं नाही. त्यामुळे अधूनमधून भारतीय स्ट्रीट फूड सेवन करणं आनंद देणारं ठरू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या