त्यावर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात चाचण्या पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली आहे.
नवी दिल्ली, 29 डिसेंबर : पुढच्या वर्षात कोरोना लस (corona vaccine) येण्याची आशा होती. त्यात आता भारतावर (india) नव्या कोरोनाव्हायरसचं (coronavirus) संकट ओढावलं. ब्रिटनमधील (britain) नव्या कोरोनानं (new coronavirus) भारतातही शिरकाव केला. नव्या कोरोनाचे 6 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सर्वांच्या काळजात धस्सं झालं आहे. त्यामुळे आता आधीच्या कोरोनावर तयार झालेली लस नव्या कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम आहे की नाही, अशा प्रश्न अनेकांना पडला. याबाबत केंद्र सरकारनं मोठी माहिती दिली आहे. नव्या कोरोनाव्हायरसविरोधातही कोरोना लस प्रभावी आहे, असा मोठा दिलासा केंद्र सरकारनं दिला आहे. नव्या कोरोनाव्हायरसबाबत केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेतली. नवा कोरोनाव्हायरस संक्रमणाचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. म्हणजे हा व्हायरस इतक्या वेगानं पसरतो आहे.
व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी 8 बदल खूप महत्त्वाचे आहेत. व्हायरसचा ज्या रिसेप्टरनं मानवी पेशीशी सोडला जातो तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. हे वाचा - ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही घातक कोरोना भारतात तयार होऊ शकतो; सरकारनं केलं सावध आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, “यूकेमध्ये गेल्या 24 तासांत 40,000 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत आणि ही इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे. ब्रिटनमधील कोरोनाचा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळेच कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोनाच्या इतर रूपापेक्षा हा व्हायरस वेगानं पसरतो आहे” पण हा व्हायरस जास्त संसर्गजन्य असला तरी कोरोना लस यावरही प्रभावी आहे, असा दिलासाही केंद्र सरकारनं दिला आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी सांगितलं, “कोरोनावरील सध्या उपलब्ध असलेल्या लशी यूके आणि आफ्रिकेतील नव्या कोरोनाशी लढण्यास सक्षम आहेत. या लशी नव्या कोरोनापासून संरक्षण देऊ शकत नाही असा कोणताही पुरवा नाही” हे वाचा - ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही घातक कोरोना भारतात तयार होऊ शकतो; सरकारनं केलं सावध “या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस. व्हायरसच्या बदलामुळे लशीच्या प्रभावावर काहीही परिणाम होणार नाही. पण त्याला थोडा वेळ लागेल. आपल्याला संयम राखावा लागेल. यावर उपचारासाठी योग्य त्या थेरेपीचा वापर करायला हवा. नाहीतर हा व्हायरस आवाक्याबाहेर जाईल”, असं आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी सांगितलं.